Women’s T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकपमधून टीम बाहेर होताच 3 खेळाडूंचा राजीनामा! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कठीण अन् रडवणारा क्षण, पाहा Video


Sophie Devine Suzie Bates and Lea Tahuhu Farewell International Cricket : महिला टी-20 विश्वचषक 2026 मधील प्रवासासोबतच न्यूझीलंड महिला क्रिकेटच्या एका सुवर्ण युगाचाही अंत झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या ग्रुप मॅचमध्ये 9 गडी राखून मिळालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. लंडनच्या द ओव्हल मैदानावर झालेला हा पराभव केवळ संघासाठी निराशाजनक नव्हता, तर या सामन्यानंतर न्यूझीलंडच्या तीन दिग्गज खेळाडू सोफी डिव्हाइन, सुझी बेट्स आणि लिया तहुहू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला.

तीन दिग्गजांची एकाच वेळी निवृत्ती

सोफी डिव्हाइन, सुझी बेट्स आणि लिया तहुहू यांनी या स्पर्धेपूर्वीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. न्यूझीलंड महिला क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या तिन्ही खेळाडूंची कारकीर्द अत्यंत नेत्रदीपक राहिली आहे. न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील सर्वात महान आणि सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू सुझी बेट्सही निवृत्त झाली. बेट्सने आपल्या 370 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कारकिर्दीत तब्बल 10,721 धावा केल्या, जो एक महाविक्रम आहे. आपल्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सोफी डिव्हाइनने 317 सामने खेळले. तिने वनडेमध्ये 4,279 आणि टी-20 मध्ये 3,817 धावा केल्या. सोबतच 241 विकेट्स घेत तिने जगातील सर्वोत्तम ऑलराउंडर्समध्ये आपले स्थान निर्माण केले. लिया तहुहू न्यूझीलंडच्या या आक्रमक वेगवान गोलंदाज हिने 15 वर्षांच्या कारकिर्दीत 207 सामने खेळत 225 बळी घेतले.

दोन्ही संघांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’

हा ऐतिहासिक क्षण अत्यंत भावनिक होता. या तिन्ही दिग्गज खेळाडूंना निरोप देण्यासाठी न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मैदानात एकत्र आले. सर्व खेळाडूंनी रांगेत उभे राहून या तिघींना गार्ड ऑफ ऑनर दिला. निरोपाचा हा सामना त्यांनी जिंकला नसला, तरी क्रिकेट विश्वाने त्यांना मानाचा मुजरा केला.

शेवटच्या सामन्यातील कामगिरी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 163 धावा केल्या. कर्णधार अमेलिया केरने सर्वाधिक 42 धावा केल्या. आपल्या शेवटच्या सामन्यात सोफी डिव्हाइन अत्यंत आक्रमक मूडमध्ये दिसली, तिने अवघ्या 14 चेंडूंत 3 षटकारांसह 30 धावांची फटकेबाजी केली. अनुभवी सुझी बेट्सने 13 चेंडूंत 19 धावा केल्या, तर लिया तहुहूला या सामन्यात एकही विकेट मिळवता आली नाही. इंग्लंडने हे लक्ष्य सहज पार करत सामना जिंकला.

हे ही वाचा –

Ind vs Aus W T20 World Cup : लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना, पण रात्री 7 वाजता अशी एक भीती, जी टीम इंडियाला वर्ल्डकपमधून बाहेर करू शकते; पाहा कसं अडकलंय सेमीफायनलचं गणित





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *