Last Updated:
लग्नासाठी दोन खासगी विमानं, जयपूरमध्ये १७ कोटींचा पॅलेस… असं आलिशान लग्न जमलं असताना सिया गोयलनं आपला होणारा नवरा केतन अग्रवालची हत्या केली.
लग्नासाठी दोन खासगी विमानं, जयपूरमध्ये १७ कोटींचा पॅलेस… असं आलिशान लग्न जमलं असताना सिया गोयलनं आपला होणारा नवरा केतन अग्रवालची हत्या केली. प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने सियाने केतनला लोहगडावरून ढकलून दिलं. सुरुवातीला तिने हा अपघात असल्याचा बनाव रचला. पोलिसांनी देखील तशीच नोंद केली. पण आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हा अपघात नसून बनाव असल्याचं समोर आलं आहे.
१८ जून रोजी केतन अग्रवालची हत्या झाल्यानंतर चार दिवसांनी पोलिसांनी या घटनेचं गूढ उघडकीस आणलं. या प्रकरणी पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. या गुन्ह्याच्या आधी सियाचं आयुष्य एकदम सुरळीत सुरू होतं. एका मोठ्या आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या घरात तिचं लग्न होणार होतं. मात्र आता मागील दहा दिवसांत सियाचं सगळं आयुष्यचं बदलून गेलं आहे.
तिने केतनला मारून ज्याच्यासोबत लग्न करण्याची स्वप्न रंगवली होती. तो चेतन चौधरी देखील गजाआड आहे. त्यामुळे आता सिया पूर्णपणे कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. रविवारी सकाळी सियाला पोलिसांनी लोहगडावर आणलं होतं. तिथे पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून सीन रिक्रिएशन केलं. सियाने केतनला गडावर कसं आणलं, दोघं वर कसे आले? केतनला नेमकं कुठून ढकलून देण्यात आलं? अशी सगळी माहिती पोलिसांकडून विचारण्यात आली.
रविवारी पहाटे सिया गोयलला क्राईम सीन रिक्रिएशन करण्यासाठी लोहगडावर आणण्यात आलं. अटकेनंतर पहिल्यांदाच ती कॅमेऱ्यासमोर दिसली… pic.twitter.com/sGtdxmJiYT
— News18 Marathi (@News18_marathi) June 28, 2026
दरम्यान, अटकेनंतर पहिल्यांदाच ती कॅमेऱ्यासमोर आली. तिने अंगात पांढरा शर्ट आणि जीन्स घातली होती. तिने आपला चेहरा लपवण्यासाठी मास्क लावला होता. अशा अवस्थेत पोलिसांच्या गराड्यात तिला पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवण्यात आलं. १० दिवसांपूर्वी एकदम आलिशान जीवन जगणारी सियाचं आयुष्य आता पूर्णपणे अंधारमय झाल्याचं दिसत आहे. तिच्याविरोधात अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Pune,Maharashtra
काय होतीस तू काय झालीस तू… अटकेनंतर सिया पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, झाली वाईट अवस्था, पाहा VIDEO
