Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा


Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी  यांच्यासोबत गप्पा

नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे आनंदाचं पान च्या या आनंददायी भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना आपल्या सगळ्यांचं लक्ष जातं ते वृत्तपत्रातल्या किंवा सोशल मीडिया वरच्या व्यंगचित्रांकडे. कारण पान घर मजकुराचे शंका येणार नाही ते एक छोटं व्यंगचित्र लगेच आपल्यापर्यंत पोहोचवतं. तर आपल्या नर्म विनोदांनी समाजातल्या विसंगती दाखवणारे आणि चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या व्यंगचित्रांच्या पुस्तकाविषयी आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. खोचक रेषा हे व्यंगचित्रकार अभिमन्यु कुलकर्णी यांचं पुस्तक आहे. तेव्हा या खोचक रेषा कोणासाठी आहेत? कशा आहेत? याविषयी आज आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. अभिमन्युजी स्वागत आहे तुमचं आनंदाचं पान मध्ये. खरं तर गेले काही दिवस महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होतात आहेत आणि व्यंग व्यंगचित्रकारांचं महत्त्व वाढतंय कारण सगळ्या सामान्यांच्या मनात ज्या काही भावना असतात त्या सगळ्या तुम्ही व्यंगचित्रकार तुमच्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यक्त करत असता जे आम्हाला सांगायचं असतं तेही तुम्ही सांगत असता वेगळ्या पद्धतीने तर मला त्या निमित्तानेच खरं तर या पुस्तकाविषयी गप्पा माराव्याश्या वाटल्या आणि खोचक रेषा मी पाहिलं की एक पुस्तक जे फक्त व्यंगचित्रांवर आधारित आहे तर ही कल्पनाच मुळात खूप वेगळी आहे तर तिथूनच सुरुवात करूया त्या कल्पनेविषयी सांगा. म्हणजे पुस्तकाच्या कल्पनेबद्दल ना तर हो हो अ मी गेली जवळ जवळ 30 एक वर्ष अ वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये चित्र काढतोय म्हणजे दिवाळी अंक म्हणजे लोकप्रभेमध्ये अ माणूस मध्ये आणि इतर अनेक नियतकालिकांमध्ये मी चित्र काढली आणि अ ह्या चित्रांचा संग्रह काढावा असं म्हणजे काही लोकांनी पण मला सांगितलं होतं आणि असं मनात होतं की एक अ एक एकत्र ती बघता येतील असा एक त्याचा संग्रह असावा आणि ते बघताना परत म्हणजे माझ्याकडचा जो संग्रह होता तो बघत बघताना लक्षात आलं की त्यातली बरीच चित्र जरी जुनी असली तरी तशी ती अ कालबाही झालेली नाहीयेत कारण तसा समाज अ बदलतो तो तसा हळूहळूच बदलत असतो त्यामुळे अ एखादं चित्र समजा अगदी 2000 साली काढलेलं असेल तर ते आज पाहताना असं ते जुनं झालंय असं वाटत नाही कारण आपल्या समाजामध्ये बऱ्याच इश्यूज आहेत ते अजूनही अ अ तसेच आहेत आणि अ ह्या विचारातून ते चित्र हे म्हणजे संग्रह काढायचं ठरवलं की अ अशी अ चित्र आजही लोकांना ती बघण्यात मजा येईल आणि त्यात मग वेगवेगळ्या थीम्स वगैरे मग अ अशा पद्धतीनं ते त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे चित्रांचं अ आणि अर्थातच त्याच्यात राजकारणावरती खूपच चित्र आहेत म्हणजे तो माझा आवडता विषय आहे पण इतरही म्हणजे गुन्हेगारी टेक्नॉलॉजी अ आणि इतरही बऱ्याच विषयांवरती चित्र आहेत त्याच्यामध्ये. अ खरं तर हाच अ मला प्रश्न विचारायचा होता की एखाद्या व्यंगचित्रकाराला म्हणजे आपण जसं आता पुस्तकाविषयी एरवी बोलतो तेव्हा मग कथा असतील तर कथंचं बीज कुठेतरी सापडावं लागतं किंवा कादंबरी असेल तर कादंबरीसाठी विषय सापडावा लागतो तर व्यंगचित्रकाराला त्याच्या व्यंगचित्राचे विषय असे कसे सापडतात म्हणजे काय रे हा तो माझा विषय असा कसा सुचतो? अ नाही बरं आहे चांगला प्रश्न आहे एक व्यंगचित्रकाराला त्याचे विषय खरं तर ते जीवनातूनच मिळतात म्हणजे आजूबाजूच्या जीवनाकडे पाहण्याची आपण जर काही अ थोडीशी मिश्कील अ आणि थोडीशी म्हणजे काय म्हणू शकतो आपण एक अ एनालिटिकल अशी थोडीशी आपल्याकडे दृष्टी असेल तर आपण अ त्या म्हणजे एखादी सिच्युएशन असेल तर आपण त्याच्याकडे इतर लोक बघतात पण तसं तर पाहतोच पण आपला एक त्याच्यामध्ये एक वेगळा म्हणजे एक आपली एक वेगळी नजर त्याच्यामध्ये डेव्हलप होते अ कालांतराने म्हणजे त्याला थोडिशं सराव करावा लागतो पण अ थोड्या दिवसांनी त्या नज़रेनं तुम्ही मग जगाकडे पाहायला लागतात मग इतरांना ज्या गोष्टी बऱ्याच वेळेला आपण नॉर्मल वाटतात किंवा इतरांना ज्या गोष्टी अंगवळणी पडलेल्या असतात की हे असंच असतं आपल्या याच्यात तर व्यंगचित्रकाराला तरीसुद्धा ते असं काहीतरी वेगळं वाटतं ते लहान मुलासारखं किंवा एखाद्या परदेशातून आलेल्या किंवा म्हणजे अंतराळातून आलेल्या व्यक्तीसारखं त्याला या एखाद्या गोष्टीकडे बघून असं वाटतं की अरे हे असं का असतं म्हणून आणि मग हा एकदा आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली की मग आपोआप आपल्याला व्यंगचित्रं सुचायला लागतात म्हणजे आणि मग ती कागदावर काढणं अ मग त्याच्यानंतरचा काय म्हणायचं एक त्याच्या क्राफ्टचा हा प्रश्न आहे. बेसिकली क्युरीसिटी जी म्हणतो ती आपल्याला जागृत ठेवावी लागते खरं तर परत एकदा खोचक रेषा या पुस्तकाकडे अगदी बरोबर खोचक रेषा या पुस्तकाकडे वळूया तुम्ही म्हणजे सुरुवातीला उल्लेख केला की वेगवेगळे विभाग आहेत आणि जेव्हा मी पुस्तक पाहिलं कारण आपण एरवी मी सांगते तेव्हा वाचलं असं म्हणते पण आज मी अ मुद्दाम म्हणते की मी पुस्तक पाहिलं त्यातले व्यंगचित्र पाहिले तेव्हा लक्षात आलं की वेगवेगळे विभाग केलेले आहेत यात आणि मग म्हणजे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्यंगचित्र आहेत तर थोडसं त्याबद्दलही सविस्तर सांगा. हा तर अ मला असं वाटतं म्हणजे अगदी इन जनरल म्हणायचं झालं व्यंगचित्रांच्या बाबतीत किंवा कुठल्याही म्हणजे आपल्या जीवनातल्या क्षेत्राबद्दल म्हणायचं झालं म्हणजे राजकारणच असं नाही अ म्हणजे आता गुन्हेगारी घ्या किंवा मेडिकलचा व्यवसाय घ्या म्हणजे डॉक्टर लोकं घ्या किंवा लहान मुलं घ्या तर आपल्याला असं वाटेल की ह्यांच्यामध्ये अ काय असं साधर्म्य आहे? अ तर एका दृष्टीने आपण पण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सर्व हे सर्व दिसणारे जे ह्या गोष्टी आहेत त्या तश्या थोड्याश्या वरवर वेगळ्या आहेत. हं हं या सगळ्यांच्या आतमध्ये आपण एक माणसच आहोत आणि अ माणसं एखाद्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं विचार करतात किंवा वावरतात किंवा त्यांना काय त्यांचे सुख-दुःख असतात किंवा अपेक्षा असतात किंवा अपेक्षाभंग असतात ते अ सारखेच असतात. अ तर मला पर्सनली म्हणजे मला ह्या अशा गोष्टीचं फार म्हणजे पहिल्यापासून कुतूहल आहे की एखादा गुन्हेगार आपण म्हणतो त्याला तुरुंगात टाकलं आणि तो एक वाईट माणूस म्हणून माणसं त्याच्याकडे बघतात पण हं तोही एक माणूसच आहे आणि त्याच्याबद्दल आपण एक माणूस म्हणून असा विचार केला म्हणजे त्यानं केलेल्या गुन्ह्याची माफी करण्यासाठी नाही तर हं त्यानं असं का केलं असेल याचा आपण जर का विचार करायला लागलो तर आपल्याला अ लक्षात येतं की म्हणजे अ त्याच्यामध्ये पण अ अनेक असे पैलू आहेत की अ जे परहॅप्स आता इतरांना लोकांना वरवर कळत नाहीत पण ते एखादा लेखक किंवा एखादा व्यंगचित्रकार त्या पैलूंना पैलूंकडे पाहून म्हणजे त्यांना थोडासा उठाव देऊ शकतो आपल्या चित्रांच्यामध्ये आणि मला असं वाटतं की आता मी अ तुम्ही चित्रांमध्ये बघितलं तर अनेक गुन्हेगारांची माझी चित्रं आहेत अंडरवर्ल्डवरची पण खूप चित्रं आहेत त्याच्यामध्ये तर ती त्याच्यामध्ये असं दाखवलंय की ती लोकं घरी कसे वागत असतील म्हणजे हं कारण त्यांची घरं असतील त्यांची हं बायको पोरं असतील त्यांची मुलं शाळेत जात असतील हं त्यांनाही कधीतरी सर्दी होत असेल तर ह्या गोष्टी झाल्यावरती ही अ लोकं कसं त्याच्याबरोबर डील करत असतील आपण म्हणजे आपण असा विचार करतो की ओ असा अ गुन्हेगार म्हणजे तो सतत हातामध्ये चाकू किंवा पिस्तूल घेऊनच फिरत असेल असं नसतं ना त्या बद्दल अ मला ह्या गोष्टींचं फार म्हणजे गंमतही वाटते आणि मला कुतूहलही वाटतंय आणि मला असं वाटतं की ह्या दृष्टीतून मी सगळ्यांच्याबद्दलच म्हणजे राजकारण्यांच्याबद्दलही मी तसाच विचार करतो की ती माणसच आहेत अ शेवटी आणि ते करताना आपल्याला असे अनेक अ त्यांच्यामध्ये अँगल सापडतात की जे जे स्वतःला तर हसू येतंच आणि मला असं वाटतं दुसऱ्यांनाही हसू येतं की त्याच्यावरती जर का मग चित्र काढलं तर अ असं माझं म्हणजे दृष्टिकोन आहे त्याच्यावरती. अ एखादी मोठी राजकीय घटना जेव्हा घडते म्हणजे आता 2019 पासून सततच घडतात मोठ्या राजकीय घटना तर असं व्यंगचित्रकाराच्या हा जीव सुटतात का चला मिळाला विषय चला आता काहीतरी भन्नाट करूया असं काही होतं का? हं हं हं हं हं नाही नक्कीच होतं नक्कीच होतं आणि त्याच्यामध्ये एक असं असतं की अ की एक अ वेगळा त्याच्यामध्ये काय आपण अ म्हणजे त्याला पैलू आपण अ ऍड करू शकतो म्हणजे एखादी घटना घडते त्यावेळेला अ त्याची खूप चर्चा होते अ उलटसुलट अ त्याच्यावरती खूप विनोद होतात त्याच्यावरती आजकाल तुम्ही म्हणाल तर त्याच्यावरती मीम्स होतात आणि ट्रोल्स होतात वगैरे तर आपण एक व्यंगचित्रकार म्हणून त्याच्यामध्ये काय नवीन दृष्टिकोन आणू शकतो की जो वाचून अ म्हणजे वाचकांना असं वाटेल की अरे हा हे काहीतरी नवीन आपल्याला याच्यातून दृष्टी मिळाली तर म्हणजे असा एक अ आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो की अर्थातच आनंद होतो पण अ ते चॅलेंज पण असतं म्हणजे की मी आता काय याच्यामध्ये नवीन काहीतरी शोधून काढू मी नाही म्हणजे मी पर्सनली म्हणून सांगते की प्रत्येक बातमीची बातमीदारी म्हणून काम करताना दुसऱ्या दिवशी काय बरं व्यंगचित्र बघायला मिळेल हे आमच्याही डोक्यात कायम असतात ती बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असताना मला खरं तर वेगळा एक प्रश्न विचारायचा होता की अ व्यंगचित्र म्हटलं की आर के लक्ष्मणंचं नाव येतं मराठीत ते खूप मोठे व्यंगचित्रकार झालेत तुम्ही अ म्हणजे कोणाकडे बघून की मला अशा पद्धतीचं काम करता आलं पाहिजे असं सा अ अ तुमच्या म्हणजे आदर्श कोणाचं म्हणूया आपण? माझे आदर्श आणि खरं तर माझे माझे गुरु सुद्धा असं म्हटलं तर वसंत सरवटे हं यांची चित्रं मला पहिल्यापासूनच खूप आवडायची म्हणजे वसंत सरवटे अर्थात लक्ष्मण हे अ खूपच पॉप्युलर आहेत आणि ते खरं ग्रेटच आहेत म्हणजे आणि त्यांचाही मी खूप अभ्यास केला पण मराठीत अ व्यंगचित्र म्हणाल किंवा एस्पेशली ज्या त्यांनी दिवाळी अंकांमध्ये अ ज्या पद्धतीची चित्रं काढली वसंत सरवटेनी मला असं वाटतं त्यांनी एक वेगळाच म्हणजे नुसताच मराठी व्यंगचित्रांना नाही तर मला असं वाटतं की भारतीय व्यंगचित्रांना त्यांनी एक वेगळा म्हणजे मार्गच दिला आणि माझ्यासारख्या अ ना म्हणजे आम्ही त्यांच्या वेळेला लहान होतो म्हणजे ते असताना तर आमच्यासारख्यांना एक नवीन दृष्टी दिली की त्यांच्याकडे पाहून मला लक्षात आलं की व्यंगचित्र ही फक्त अ म्हणजे राजकारण्यांच्यावरची नसतात तर आपण एखादा त्या वापरलेल्या चपलांच्या जोडाबद्दल पण अशा दृष्टीने विचार करू शकतो अ की त्यांचं जीवन काय आहे आणि त्यांच्यामधल्या व्यंगचित्रांचा आपण शोध घेऊ शकतो म्हणजे तर ही सगळी दृष्टी खरं तर सरवटेनीच अ मला तर असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांनी मराठीत अ ती आणली आणि अ त्यांचा खरं तर माझ्या पुढं खूपच आदर्श होता अर्थात इतरही खूप अ व्यंगचित्रकार होते श्याम जोशींचा पण अ मला चित्र खूप आवडायची त्यांची पण अ खूप इन्फ्लुएन्स आहे माझ्यावरती आणि अर्थात इतर ग्रेट बरेच लोकं आहेत फडणीस आहेत आणि ही खूप अ खूप लोकं आहेत पण अ सरवटे हे अ खरं तर माझ्यावरती सगळ्यात मोठा इन्फ्लुएन्स अ होताच म्हणता येईल. अभिमन्युजी खरं तर अ अ मी जेव्हा हे पुस्तक हातात घेतलं तेव्हा ते लगेच चाळून संपवलं आणि अ जे आपण म्हणतो ना कामाचा स्ट्रेस घालवणारा अशा पद्धतीचं पुस्तक आहे तर तुमच्या पोतडीत आणखीन बरीच व्यंगचित्रं असतील तर आणखीन काही याचा असा भाग किंवा एखाद्या विषयाला वाहिलेला अ असं पुस्तक की ज्यात फक्त एकाच विषयावरची व्यंगचित्रं असतील असं काही मानस आहे? हो अक्च्युली मी पण ते मी इंग्लिश मध्ये काढलं आता एक पुस्तक मी अ म्हणजे बॉलिवूड फॉर बिगिनर्स म्हणून एक पुस्तक अ काढलेलं आहे ते म्हणजे फक्त सिनेमा इंडस्ट्रीशीच अ म्हणजे सिनेमा इंडस्ट्रीवरचीच जवळ जवळ 150 एक त्याच्यामध्ये चित्रं आहेत मी अ म्हणजे सुरुवातीला एक छंद म्हणून अ आणि नंतर थोडसं सीरीयस म्हणून मी पटकथा पण लिहीत होतो म्हणजे एक माझ्या अ नोकरी बरोबर वगैरे आणि ही चित्रं काढताना तर त्या माझ्या चित्रपट सृष्टीतल्या अनुभवावरती अ ते मी पुस्तक अ आता अक्च्युली या खोचक रेषा बरोबरच ते पब्लिश केलं पण फक्त ते इंग्लिश मध्ये आहे अ पण नक्कीच अ माझा अ विचार आहे की आणि मला मी जसं सांगितलं तसं मला हे गुन्हेगारी जगाबद्दल फार फॅसिनेशन आहे तर जर का काढायचं असेल तर मी त्याच्यावरती एक अ अ खास अ पुस्तक काढावं असं मला अ काढायला आवडेल. हं अगदी शेवटचा प्रश्न अभिमन्युजी की एखादा चांगला व्यंगचित्रकार म्हणजे आता अ चित्रांबद्दलही थोडीशी माहिती असावीच लागत असेल अ रेषांचं ज्ञान असायला हवं असेल काय काय असावं लागतं म्हणजे तुम्हाला अ काय वाटतं की हे सगळं असेल तर एक माणूस एखादं छान व्यंगचित्र काढू शकतो? अ मी म्हणेन की फार चांगला चित्रकार असायची गरज नाहीये व्यंगचित्रकार होण्यासाठी पण चित्रकलेचं एक अ म्हणजे बेसिक अ नॉलेज तुम्हाला हवं कारण मग काय होतं की तुमच्या मनात एक चांगली कल्पना असते पण ती अ कागदावर तुम्ही जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत अर्थातच तुम्हाला ती दुसऱ्याला दाखवता येत नाही आणि दुसऱ्याला दाखवण्यापेक्षा सुद्धा आपण त्या कल्पनेकडे बघण्यासाठी ती कागदावर उतरवणं महत्त्वाचं असतं कारण मनात असते त्यावेळेला ती कल्पना आपल्याला खूप छान वाटते पण बऱ्याच वेळेला ती कागदावरती काढली आपण की आपल्या लक्षात येतं की अरे हे एवढं खास होत नाहीये हे काहीतरी वेगळं काहीतरी आपल्याला करायला हवं त्याच्यात. तर एक चांगला व्यंगचित्रकार होण्यासाठी अ तितपत तरी तुम्हाला अ चित्रकला यायला हवी तुम्ही काय वापरून चित्र काढता म्हणजे पेन्सिल वापरून काढता का ब्रश वापरून काढता का अ म्हणजे अगदी अ खडू वापरून काढता अ ते ते महत्त्वाचं नाही पण अ थोडीशी एक अ चित्रकला यायला हवी मग त्याच्यात हळूहळू आपली एक स्वतःची शैली पण अ डेव्हलप होते म्हणजे आपले विचार आणि आपली चित्रं यांचा एक कुठेतरी मग अ म्हणजे अ त्याचा एक अ अ मिक्स होऊन त्याचं असं एक आपली एक स्वतःची स्वतंत्र अ दृष्टी किंवा आपली एक स्वतंत्र शैली त्याची निर्माण होते तर मला वाटतं ह्या गोष्टी एक अ चित्र काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत पण सगळ्यात त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अर्थात तुम्हाला दृष्टी असायला हवी तुमच्याकडे एक मिश्कीलपणा हवा आणि कुणावरती फार राग असता कामा नये असं मला वाटतं आणि मला असं विजय तेंडुलकरांनी पण एकदा खूप मोलाचा सल्ला दिला की अ अ मारिओ मिरांडांच्या मध्ये फॉर इन्स्टन्स की असं अ माणसा माणसांच्याकडे बघताना त्यांच्या माणूसकीवरती प्रेम कर म्हणून आणि हा मला असं वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे व्यंगचित्रकारांसाठी कारण तुम्ही राग घेऊन जर का चित्र काढायला लागलात तर मग ती चित्रं थोडीशी अशी काय म्हणायचं कल्पनाबंबाळ होतात हं हं हं मग ती त्याच्यापेक्षा तुम्ही लेख किंवा अग्रलेख लिहिलेला चांगला तर व्यंगचित्र काढायचं असेल तर अ व्यंगचित्रकाराने थोडसं मिश्कील असायला हवं आणि मिश्कील असण्यासाठी तुम्हाला अ असा म्हणजे फार राग येता कामा नये तुम्हाला दुसऱ्याबद्दल थोडीशी कणव वाटली पाहिजे त्यांच्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे आणि तसं तरच तुम्ही अ थोडेसे अ लाईटली अ जीवनाकडे बघायला अ शिकता आणि ते कुठल्याही सिच्युएशनकडे असं लाईटली बघणं आणि ते एखादं लहान मूल बघतं तसं त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्या सिच्युएशनला म्हणजे काय म्हणायचं एक्झामिन करणं हे अ थोडसं महत्त्वाचं असतं व्यंगचित्रकारासाठी आणि मला वाटतं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अ एक व्यंगचित्रकार होण्यासाठी. नाही खरंच अ तुम्ही अ आज जे आम्हाला व्यंगचित्रांबद्दल सांगितलं तेही खूप छान होतं आणि पुस्तक अर्थात खूप छान झालेलं आहे. आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात गप्पा मारल्यात त्यासाठी खूप आभार आणि अर्थात पुस्तक आता अ प्रकाशित झालंय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी शुभेच्छा. आजची लक्षवेधी पुस्तकं कोणती हे आता जाणून घेऊया. आजचं पहिलं पुस्तक आहे बालकुमारांसाठी अभिजीत प्रकाशनाचं हे पुस्तक आहे ज्याचं नाव आहे गोष्ट त्यांची ऐका वर्षा गजेंद्रगडकर यांचं हे पुस्तक फॅन्टसीकडे जाणारं असं पुस्तक आहे आणि खास बालकुमारांसाठीच आहे. आजचं दुसरं पुस्तक आहे जळगावच्या शब्दगंध प्रकाशनाचं हा एक कथासंग्रह आहे मातीच्या रेषा आणि इतर कथा सुरेश चव्हाण याचे लेखक आहेत एक फारच वेगळं पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचलंय सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्यकथा नावाचं प्राध्यापक डॉक्टर शिवाजी मस्के यांनी हे लिहिलंय आणि मिहाना प्रकाशनाचं प्रकाशन आहे. युवा पिढीचा आवडता कार्यक्रम आहे अक्षर अक्षर तुझेच आहे त्यातील एक कवी आहे नैनेश तांबे त्यांचा पहिला कवितासंग्रह आहे ज्याचं नाव आहे या शहराने दिलेलं रिटर्न गिफ्ट न्यू इरा प्रकाशनाचं हे नवकोरं पुस्तक आहे आणि कवीचाही पहिलाच कवितासंग्रह आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमात पुस्तकरूपी खाऊ आणि तोही वेगवेगळ्या प्रकारचा देण्याचा आमचा प्रयत्न होता पुढच्या आठवड्यातही हाच आमचा प्रयत्न असणार आहे तेव्हा वाचत रहा धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.

शिक्षण व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा

Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *