Weekly Horoscope 29 June To 5 July 2026: जून (June 2026) महिन्याचे शेवटचे अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हा महिना अनेकांचे नशीब पालटणारा ठरला, आजपासून एक नवा आठवडा सुरू होतोय. हा आठवडा 29 जून ते 5 जुलै असा आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल, या काळात वटपौर्णिमा, संकष्टी चतुर्थीसारखे सण येत आहेत. हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी तूळ ते मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना नव्या आठवड्यात भाग्याची साथ लाभेल, ज्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत नवीन संधी मिळू शकते, तर व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. प्रेमजीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. कुटुंबीयांसोबत एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील..
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवा आठवडा कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमची मेहनत वाया जाणार नाही. नोकरीत वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. व्यवसायात सावधगिरीने निर्णय घेतल्यास चांगला फायदा होईल. आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका. प्रेमसंबंधात संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधींचा लाभ मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात विस्तारासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक लाभ होईल आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. प्रेमजीवन आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील आणि आत्मविश्वास वाढेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा यश आणि प्रगतीचा ठरेल. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि बचतीवर भर देता येईल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. आरोग्य चांगले राहील, मात्र नियमित व्यायाम सुरू ठेवा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा नवीन कल्पना आणि नियोजनामुळे कार्यक्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात मोठ्या संधी मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या लाभदायक आठवडा असून नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. प्रेमसंबंधात विश्वास आणि जवळीक वाढेल. मित्रांकडून महत्त्वाची मदत मिळेल. आरोग्य समाधानकारक राहील.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवड्यात संयम आणि नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल, पण मेहनतीचे फळ नक्की मिळेल. व्यवसायात मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थिती स्थिर राहील. प्रेमजीवनात संवादाला महत्त्व द्या. आरोग्याच्या दृष्टीने पोटाचे विकार किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे योग्य आहार आणि विश्रांती घ्या.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report