ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार


1. देवेंद्र फडणवीस विमानात हतबल दिसले, पूर्णपणे आत्मविश्वास गमावून बसलेला माणूस, कारण त्यांना कळतंय त्यांचे पंख छाटणारे आपलेच बॉस आहेत, उद्धव ठाकरेंचा टोला  https://tinyurl.com/2k2uezaw  मला कुठले पंखच नाहीत, तर कोण माझे पंख छाटणार? माझ्यासोबत  महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आणि पक्षातल्या वरिष्ठांचा आशीर्वाद, देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/bdct6476 

2. ‘वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार…’, उद्धव ठाकरेंनी परभणीतील सभेत खासदार संजय जाधवांना फटकारलं, ओमराजेंच्या धाराशिवमध्ये ठाकरेंची सभा LIVE https://www.youtube.com/watch?v=1vzrlecphHU   संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचं पटत नाही, ठाकरेंचं नुकसान व्हावं यासाठी राऊत काम करतात, संजय जाधव यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/2zvvn4mk 

3. पुणे ग्रामीण पोलिसांकडून लोहगडावर केतन अग्रवालची हत्या कशी झाली याचा सीन रिक्रिएट, आरोपी सिया गोयलच्या उपस्थितीत तीन तासात रिक्रिएशन पूर्ण https://tinyurl.com/52mvr6x8  लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं; सिया गोयलची पोलीस चौकशीत धक्कादायक कबुली https://tinyurl.com/bds544ct 

4. विश्वास नांगरे पाटलांनी संघाची शाखा जॉईन करावी, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांची खुली ऑफर,आरएसएस देशद्रोही संघटना नसल्याचं वक्तव्य https://tinyurl.com/4xv8bc2v मला माहिती नव्हतं ते चड्डी घालतात, विश्वास नांगरे पाटलांनी संघाचं कौतुक केल्याच्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांचं खोचक उत्तर https://tinyurl.com/2fz242yw 

5. समृद्धी महामार्गावर अमरावतीमधील धामणगाव रेल्वे तालुक्यात भीषण अपघात, ट्रक अन् कारची धडक; कारमधून प्रवास करणाऱ्या चंद्रपूरच्या 5 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/abpm86nz 

6. रायगडावरील महाराष्ट्र शासनाच्या अत्याधुनिक रोपवे उभारणीस पुरातत्व विभागाची मान्यता, 50 ते 100 रुपयांत पर्यटकांना गडावर जाता येणार,संभाजीराजे छत्रपतींची माहिती https://tinyurl.com/5byhr7c9 

7. भिवंडी सत्र न्यायालयाकडून टीईटी पेपरफुटी प्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय, दोन आरोपी फरार असल्याचं समोर https://tinyurl.com/ycxcr6ey  शिक्षकांनी वर्षभर टीईटीचा अभ्यास केलाय, आता पेपरच फुटला, मग सगळ्या शिक्षकांना उत्तीर्ण घोषित करा, ठाकरेंच्या सेनेचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांची मागणी https://tinyurl.com/577d382f 

8. ऑपरेशन सिंदूरमध्ये सुभेदार मेजरसह सहा जवान शहीद, तब्बल वर्षभरानंतर पहिल्यांदाच नावे जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ‘रोल ऑफ ऑनर’ यादीत समावेश https://tinyurl.com/3uyp2xs9   

9. सोने आणि चांदीच्या दरात सलग चौथ्या आठवड्यात घसरण, चांदी 22314 रुपयांनी स्वस्त, एक किलो चांदीचा दर 2 लाख 15 हजार 485 रुपयांवर, सोन्याचा एका तोळ्याचा दर 140062 रुपयांवर https://tinyurl.com/3kcbsaxc  सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार चार दिवसात मालामाल, 88678 कोटींची कमाई,आयसीआयसीआय बँकेला सर्वाधिक फायदा तर भारती एअरटेलला फटका https://tinyurl.com/559r2wj8  

10. श्रेयस अय्यरचा आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या टी 20 मध्ये नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय,वैभव सूर्यवंशी आजही बेंचवरच,चाहत्यांची प्रतीक्षा वाढली https://tinyurl.com/2ubnyhe6  महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना, उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी भारताला विजय आवश्यक https://tinyurl.com/f948ath9  

एबीपी माझा Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *