Last Updated:
पाकिस्तानने कराचीतील पाकिस्तान रेंजर्स मुख्यालयावरील हल्ल्यानंतर २४ तासांत अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले, ३५ जण ठार, टीटीपी आणि जमात-उल-अहरारचे तळ लक्ष्य, तणाव वाढला
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे. पाकिस्तानने एका महिन्यात चौथ्यांना अफगाणिस्तानवर हल्ला केला आहे. रविवार त्यांच्यासाठी घातवार ठरला. पाकिस्तानने शेजारील देश अफगाणिस्तानच्या सीमेपलीकडे घुसून मोठा लष्करी हल्ला केला अफगाण सीमेजवळील दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हवाई हल्ले केले. या संपूर्ण कारवाईत तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे, कराची येथील ‘पाकिस्तान रेंजर्स’च्या मुख्यालयावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या २४ तासांत पाकिस्तानने ही मोठी कारवाई केली आहे. गेल्या महिनाभरातील पाकिस्तानचा हा चौथा मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी १० जून रोजी झालेल्या अशाच एका हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता.
शनिवारी कराची येथील पाकिस्तान रेंजर्सच्या प्रादेशिक मुख्यालयावर अत्याधुनिक हत्यारे आणि दारूगोळा घेऊन आलेल्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला होता. या चकमकीत पाकिस्तानचे ३ सैनिक शहीद झाले, तर प्रत्युत्तरादाखल सैन्याने ३ दहशतवाद्यांना ठार केले. या कारवाईदरम्यान एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले असून, तो अफगाण नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी संबंधित असलेल्या ‘जमात-उल-अहरार’ या संघटनेने घेतली होती.
🇵🇰🇦🇫 Pakistan just launched airstrikes across 3 Afghan provinces (Paktia, Paktika, and Kunar) with Kabul reporting civilian deaths from the strikes.
This comes a day after Jamaat-ul-Ahrar, a TTP splinter group, attacked a Pakistani military facility in Karachi killing four… pic.twitter.com/YupGQowdVy
— Mario Nawfal (@MarioNawfal) June 28, 2026
पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला म्हणजे देशातील वाढत्या दहशतवादी कारवायांना दिलेले चोख उत्तर आहे. पाकिस्तानने ही कारवाई दोन टप्प्यात केली. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली. यात ‘खान फरोश’ या कुख्यात कमांडरसह ४ दहशतवादी ठार झाले. त्यानंतर पाकिस्तानच्या फायटर जेट्सनी थेट अफगाणिस्तानची सीमा ओलांडली. अफगाणिस्तानच्या पक्तिया, पक्तिका आणि कुनार प्रांतात लपलेल्या टीटीपी आणि जमात-उल-अहरारच्या तीन मोठ्या तळांना टार्गेट करण्यात आले. या एअरस्ट्राइकमध्ये २५ दहशतवादी जागेवरच ढेर झाले, तर त्यांचा मोठा दारूगोळा नष्ट करण्यात आला.
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानात तिथल्याच पोलिसांवर आणि सैनिकांवर होणारे हल्ले कमालीचे वाढले आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ही संघटना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून पाकिस्तानात रक्तापात घडवत आहे आणि तिथली तालिबान सरकार त्यांना राजाश्रय देत आहे,” असा थेट आरोप पाकिस्तान करत आहे. अर्थात, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने नेहमीप्रमाणे हे आरोप फेटाळून लावले आहेत.
Mumbai,Maharashtra
पाकिस्तानचा मध्यरात्री अफगाणिस्तानवर पुन्हा एअर स्ट्राइक; 35 जणांचा जागीच मृत्यू
