आरोग्य विभागाची मोठी कारवाई, माढा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांच निलंबन, नेमकं प्रकरण काय?


Solapur Madha News : सोलापूर जिल्ह्यातील माढा ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास मेमाणे यांच्यासह एकूण नऊ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आलं आहे. 14 महिन्यापूर्वी घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळं एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागानं हा निर्णय का घेतला? नेमकं प्रकरण काय? याबाबतची माहिती पाहुयात. 

नेमकं प्रकरण काय?

मागील वर्षी म्हणजे एप्रिल 2025 मध्ये माढा ग्रामीण रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. प्रसुती झालेल्या महिलेकडून ग्रामीण रुग्णालयातील वॉर्डची स्वच्छता करुन घेतल्याची घटना समोर आली होती. प्रसुती नंतर या महिलेने आठ दिवस स्वच्छता केली होती. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. माढा तालुक्यातील खैराव येथील हेमा धडे (वय 30) या 1 एप्रिल 2025 रोजी प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्याच दिवशी रात्री त्या प्रसुती झाल्या. त्यांचे सीझर झाले होते. त्यामुळं त्या रुग्णालयातच अॅडमीट होत्या. या काळात त्यांचे पतीव त्यांच्याकडून रुग्णालयातील वॉर्डची व स्वच्छतागृहाची स्वच्छता करुन घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या घडनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. या घटनेनंतर माढ्यातील सामिजीक कार्यकर्ते शंभू साठे यांनी संबंधित विभागाला जाब विचारत धारेवर धरले होते. तसेच या प्रकरणी वैदियकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावं अशी देखील मागणी केली होती. त्यानंतर आरोग्य विभागां चौकशी सुरु केली होती. 

अखेर 14 महिन्यानंतर आरोग्य विभागानं या प्रकरणाची दखल घेत कारवाई केली 

दरम्यान, अखेर 14 महिन्यानंतर आरोग्य विभागानं या प्रकरणाची दखल घेत माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांचे निलंबन केलं आहे. या सर्वांवर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निलंबीत झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधीक्षत डॉ. विलास मेमाणे, दिव्या गवळी, स्मीता जमदाडे, चंद्रकांत गोवर, सौदागर जाधव, सत्यजीत राठोड, शुभम डाकूलवार, भरत कोटीवाना आणि स्वप्नील जाधव या कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभागानं कारवाईचा बडगा उगारला आहे. या सर्वांचे निलंबन करण्यात आलं आहे.   

या करावाईला तब्बल 14 महिन्यांचा वेळ का लागला? 

दरम्यान, या प्रकरणी ज्यांनी आवाज उठवला होता, ते माढ्यातील सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांच्याशी देखील एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, आरोग्य विभागानं केलेल्या या कारवाईचं आम्ही स्वागत करतो. पण या करावाईला तब्बल 14 महिन्यांचा वेळ का लागला? असा सवाल शंभू साठे यांनी उपस्थित केला आहे. निलंबनाच्या कारवाईला एवढा वेळ का लागला? याची देखील चौकशी होणं गरजेचं असल्याचे शंभू साठे यांनी सांगितले.  



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *