Vivo चे दोन लोकप्रिय 5G फोन महाग, स्मार्टफोन खरेदी करताना मोजावे लागणार 3 हजार रूपये – Marathi News | Two popular Vivo 5G phones have now become more expensive and you will have to pay more to purchase them


विवोने नुकतेच भारतात त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज, विवो टी5 लाइट 5G लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा फोन 16 जुलै रोजी भारतीय बाजारात सादर केला जाईल. मात्र यापूर्वी कंपनीने याच सिरीजमधील त्यांचे लोकप्रिय असलेले मॉडेल्स, विवो टी5एक्स 5G आणि विवो टी5 प्रो 5G यांच्या किमती वाढवल्या आहेत. आता ग्राहकांना हे दोन्ही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. चला तर मग आजच्या लेखात या फोनच्या दरवाढीने हे फोन कोणत्या किंमतीत ग्राहकांना खरेदी करावे लागणार आहे ते जाणून घेऊयात.

Vivo T5 Pro 5G ची दरवाढीनंतरची नवीन किंमत

Vivo T5 Pro च्या किमतीत सर्वात मोठा बदल झाला आहे. कंपनीने दोन्ही व्हेरिएंटच्या किमतीत 3 हजार रूपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेले मॉडेल आता 32 हजार 999 रूपयांवरून 35 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध होईल. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 36 हजार 999 रूपयांवरून 39 हजार 999 पर्यंत वाढली आहे.

Vivo T5 Pro 5G ची खास वैशिष्ट्ये

Vivo T5 Pro 5G त्याच्या मोठ्या बॅटरी आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. यात 9020mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी दीर्घकाळ टिकण्याची हमी देते. कंपनीच्या मते फोनमध्ये तुम्ही बराच वेळ सतत व्हिडिओ पाहू शकतो. हा फोन 90W फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करतो.

हा स्मार्टफोन IP68 आणि IP69 रेटिंगसह येतो, ज्यामुळे तो पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. उत्तम कामगिरीसाठी, यात स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर आहे. गेमिंग दरम्यान फोन जास्त गरम होऊ नये म्हणून यात एक मोठी व्हेपर कूलिंग सिस्टीम देखील आहे.

या फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.83-इंचाचा 1.5K AMOLED स्क्रीन असून तो 144Hz रिफ्रेश रेट आणि 5000 nits पर्यंतच्या ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सलचा सोनी सेन्सर आहे, तर सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

Vivo T5X 5G च्या किंमतीतही बदल झाला आहे

Vivo T5x 5G च्या किंमतीत 2 हजार रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत दरवाढी आधी 26 हजार 999 रूपये होती, मात्र आता 27 हजार 999 रूपये झाली आहे. तसेच 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट आता 30 हजार 999 रूपये इतकी झाली आहे.

Vivo T5X 5G ची वैशिष्ट्ये

Vivo T5x मध्ये MediaTek Dimensity 7400 Turbo प्रोसेसर आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.76-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 7200mAh क्षमतेची बॅटरी असून तो 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

हा फोन मजबूत बॉडी आणि IP69+ रेटिंगसह येतो.

फोटोग्राफीसाठी, यात 50-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. दोन्ही फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ओरिजिनओएस (OriginOS) वर चालतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *