Last Updated:
Samay Raina Controversy: सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान समय रैनावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
मुंबई: आपल्या बिनधास्त पण तितक्याच वादग्रस्त विनोदी शैलीने सोशल मीडिया गाजवणारा प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना सध्या एका अत्यंत गंभीर कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. स्टेजवर आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना भरभरून हसवणारा समय आता मोठ्या अडचणीत अडकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान समय रैनावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
एका सुनावणीदरम्यान, कोर्टाची दिशाभूल करण्याचा आणि खोटे बोलल्याचा गंभीर ठपका ठेवत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समयला चक्क १० लाख रुपयांचा दणदणीत आर्थिक दंड ठोठावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे युट्युब कम्युनिटीसह सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
सर्वोच्च न्यायालयासमोर खोटी विधाने केली
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचा पारा कमालीचा चढला होता. न्यायमूर्तींनी समयाच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोर्टाने अत्यंत कडक आणि तिखट शब्दांत टिप्पणी करताना म्हटले, “कॉमेडियन समय रैनाने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची थट्टा केली आहे. त्याने न्यायालयात खोटी विधाने केली असून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.” या सुनावणीनंतर समय रैनाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पैसे न भरल्यास थेट पोलीस कारवाई?
न्यायालयाने केवळ १० लाखांचा दंड लावून हे प्रकरण सोडलेले नाही, तर त्यासोबतच एक गंभीर इशाराही दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, जर समय रैनाने हा १० लाख रुपयांचा दंड वेळेत जमा केला नाही, तर त्याच्याविरोधात अत्यंत कठोर आणि कायदेशीर बळाचा वापर करून थेट कारवाई केली जाईल.
Mumbai,Maharashtra
Samay Raina: ‘कोर्टाला हलक्यात घेतो का?’, कॉमेडियन समया रैनावर सुप्रीम कोर्टाचा संताप, सुनावणी दरम्यान मोठा निर्णय
