Alia Bhatt in Tumbad 2: ‘पुन्हा हस्तरचा थरार…; ‘तुंबाड 2’मध्ये आलिया भट्टची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रिलीज डेटही जाहीर


Tumbbad 2 Alia Bhatt Confirms Role: नवाझुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui)बहुचर्चित एन्ट्रीनंतर आता ‘तुंबाड 2’ने आणखी एका मोठ्या कलाकाराच्या नावाची घोषणा केलीये. आलिया भट्ट (Alia Bhatt) अधिकृतपणे या बहुप्रतीक्षित सिक्वेलमध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, तिनं पोस्ट शेअर करुन याची अधिकृत माहिती आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. 

‘तुंबाड 2’मध्ये आलिया भट्टची एन्ट्री (Alia Bhatt Confirms Role in Tumbbad 2)

‘तुंबाड 2’ हे विश्व आता आणखी भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीच्या सहभागानंतर आता आलिया भट्टचीही  या सिनेमात एन्ट्री झाली आहे. भारतीय सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आलियाची या वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुप्रतीक्षित सिनेमॅटिक विश्वात झालेली एन्ट्री प्रेक्षकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. आलिया भट्टने आतापर्यंत अनेक जॉनरच्या चित्रपटात काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता ती हॉरर – थ्रिलर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता-निर्माते सोहम शाह आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबतची तिची ही पहिलीच जुगलबंदी असणार आहे. 

या तिन्ही कलाकारांच्या एकत्र येण्याने ‘तुंबाड’च्या विश्वात तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनांची भर पडणार आहे. सोहम शाह यांनी उभारलेले हे विश्व, नवाझुद्दीन सिद्दीकी यांची प्रभावी अभिनयशैली आणि आलिया भट्टची महत्त्वपूर्ण नवी भूमिका यामुळे ‘तुंबाड 2’मध्ये एक वेगळीच रंगत निर्माण होणार, यात शंका नाही. दरम्यान, नवाझुद्दीन सिद्दीकी नेमकी कोणती भूमिका साकारणार? आलिया भट्ट या सिनेमात कोणत्या भूमिकेत झळकणार, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

‘तुंबाड 2’ बाबत आलिया भट्ट म्हणाली, ‘जेव्हा पहिल्यांदा मी ‘तुंबाड’ हा सिनेमा पाहिला, तेव्हापासून हा सिनेमा माझ्या मनात कायम कोरला गेला आहे.  इतकं वेगळं, प्रेक्षकांना पूर्णपणे त्या विश्वात घेऊन जाणारं जग फारच कमी चित्रपट निर्माण करू शकतात’, असं सिनेमाचं कौतुक करत आलिया भट्ट म्हणाली. ‘सोहम आणि नवाझुद्दीन सिद्दीकी या दोन्ही कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा फार पूर्वीपासून होती. या सिनेमात मी त्यांच्यासोबत काम करतेय, याचा मला खूप आनंद आहे. आम्ही एकत्र काय निर्माण करत आहोत, ते प्रेक्षकांनी अनुभवावं यासाठी मी आतुर आहे’, असं म्हणत आलियाने या सिनेमात काम करण्याची उत्सुकता दर्शवली. दरम्यान, ‘तुंबाड 2’ हा सिनेमा 3 डिसेंबर 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

साऊथ सिनेमा अन् वेब सिरीजचा बोलबाला; ‘या’ 7 क्राइम, कॉमेडी अन् Action सिनेमांनी डोकं चक्रावून सोडलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *