Ashok Kharat: अशोक खरातचा जेलमध्ये नवा बिझनेस, पहाटेच उठून… जेलमधून आली अपडेट | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

लोकांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदू खरात शंभर दिवसाहून अधिक दिवस जेलमध्ये असून जेलमध्ये त्याने नवा बिझनेस सुरू केला आहे.

Ashok Kharat-
Ashok Kharat-

नाशिक : आपल्याकडे दैवीशक्ती असल्याचे भासवून शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप नाशिकच्या अशोक खरातवर आहे. लैंगिक अत्याचार तसेच आर्थिक फसवणूक प्रकरणातील दाखल असलेल्या गुन्ह्यात अशोक खरात चार महिन्यापासून जेलची हवा खात आहे. लोकांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदू खरात शंभर दिवसाहून अधिक दिवस जेलमध्ये असून जेलमध्ये त्याने नवा बिझनेस सुरू केला आहे.

एका वर्तमानपत्राला जेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खराचा जेलमध्ये मोठा दरारा आहे. जेलमधील कर्मचारी आणि इतर कैद्यांच्या प्रश्नांना अशोक खरात प्रचंड वैतागला असून सध्या त्याने मौन धारण केले आहे. खरातला जेव्हा जेलमधील इतर कर्मचारी भेटता त्यावेळी ते खरातला त्यांच्या भविष्याविषयी किंवा त्यांच्या कारनाम्यासंदर्भातील प्रश्न विचारतात. मात्र अता खरातला जेल प्रशासनाने वेगळ्या बराकीत ठेवले आहे जेणेकरून इतर कर्मचारी त्याला त्रास देणार नाही. सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे खरातने देखील मौन धारण केले आहे.

कशी आहे दिनचर्या? 

भोंदूबाबा अशोक खरात सध्या नाशिकमधील नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहे. अशोक खरातला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळत आहे. खरात सध्या अंडरट्रायल कैदी आहे. त्याला वेगळ्या बराकीत ठेवले आहे. त्याला कोणतीही व्हीआयपी सुरक्षा दिलेली नाही. अंडरट्रायल कैद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुरुंग प्रशानाची असल्याने त्याला वेगळ्या बराकीत ठेवले आहे. मात्र तिथे त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात सध्या सकाळी उठल्यानंतर ध्यान करतो आणि मोठयाने मंत्रोच्चार करत तो विशेष साधना करत असतो. कधी सेलिब्रिटी आणि राजरकारणातील मंत्र्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या अशोक खरातची दिनचर्या अशीच आहे.

लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहार

खरातवर सर्वात गंभीर आरोप म्हणजे धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने केलेले महिलांचे लैंगिक शोषण. अनेक पीडित महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या असून, ‘आध्यात्मिक शक्ती’ मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. याव्यतिरिक्त, त्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही उघड झाले आहे. खरातच्या अटकेनंतर आता अनेक नवीन तक्रारदार समोर येत असून, तपासात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *