Bollywood Singer Anuradha paudwal on Personal Life: आपल्या सुमधुर आवाजातून प्रेक्षकांच्या मनात घर तयार करणारे आणि लाखो लोकांची मने जिंकणारे अनुराधा पौडवाल यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. गायिका अनुराधा यांची ओळख केवळ त्यांच्या गाण्यासाठी नसून, त्यांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान आहे. पण वैयक्तिक आयु्ष्यात त्यांनी अनेक चढ उताराचा सामना केला आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय घडलं? याचा पहिल्यांदाच आपल्या पॉडकास्टमधून खुलासा केला आहे. 2020 साली त्यांनी आपल्या 35 वर्षीय मुलाला गमावलं होतं. पण त्यापूर्वी त्यांनी आपल्या एका नवजात मुलीलाही गमावलं असल्याची माहिती त्यांनी मुलाखतीतून दिली. त्यांनी यातून स्वत:ला कसं सावरलं? पाहूयात.
फक्त 25 दिवसांत अनुराधा यांच्या नवजात मुलीचे निधन (Anuradha paudwal on Personal Life)
न्यूज बूकला दिलेल्या मुलाखतीत अनुराधा पौडवाल यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. अनुराधा पौडवाल यांनी मुलाखतीत सांगितलं की, त्यांची पहिली मुलगी फक्त 25 दिवसांची होती, जेव्हा तिनं या जगाचा निरोप घेतला. हा गायिकेच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता, असंही त्यांनी सांगितलं. या दु:खातून त्या पूर्णपणे खच्चून गेल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.
अनुराधा पौडवाल यांनी मुलाखतीत सांगितलं की, नवजात मुलीच्या मृत्यूनंतर त्यांची जगण्याची आणि गाण्याची इच्छा संपली होती. अनुराधा पौडवाल यांनी मुलाखतीत सांगितलं की, ‘मी संगीत विश्व सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. सगळं काही संपलं होतं, असं वाटत होतं. त्यानंतर मी दक्षिणेश्वर काली मंदिरात गेले होते. तिथे काली देवीसमोर प्रार्थना केली. त्यानंतर हळूहळू माझ्या आयुष्यात नवीन वळण मिळालं’, असं अनुराधा पौडवाल मुलाखतीत म्हणाल्या.
काळ जसं ओलांडत गेला, त्यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. पण 2020 साली त्यांच्यावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला. किडनी निकामी झाल्यामुळे अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल, यांचा वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले. मुलाच्या निधनानंतर अनुराधा पुन्हा एकदा खचल्या होत्या. पण त्यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मुलाच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण संगीत क्षेत्राला धक्का बसला. माहितीनुसार, अनुराधा पौडवाल यांचे प्रसिद्ध संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी विवाह झाला होता. 1991 साली अरुण पौडवाल यांचे निधन झाले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव