Vidhan Parishad Election 2026: राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे. अशातच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सध्याचं राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठ्या बंडखोरीचा (Rebellion) सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक जागांवर अधिकृत उमेदवारांविरोधात स्वपक्षीय आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय गणिते पूर्णपणे बिघडली आहेत. अशातच आता महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी हालचालींना मोठा वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan)आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यात अर्धा तास बैठक संपन्न झाली आहे.
Vidhan Parishad Election 2026: अर्ज मागे न घेतल्यास पक्षातर्फे शिस्तभंगाच्या कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, भेटी दरम्यान लवकरात लवकर बंडखोरी मोडीत काढून निवडणूक सुरळीत पार पाडण्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधातील बंडखोरांशी यावेळी संपर्क साधण्यास सुरुवात झालीय. दरम्यान, अर्ज मागे न घेतल्यास पक्षातर्फे शिस्तभंगाच्या कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. त्यामुळे या तंबीनंतर तरी बंडखोर उमेदवार माहेर घेतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Mahayuti : बंडखोरांना थंड करण्यासाठी दोन्ही प्रदेशाध्यक्षांमध्ये चर्चा
सुनील तटकरे हे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या भेटीला आले होते. यावेळी रायगड या शासकीय निवासस्थानी तटकरे व चव्हाण यांच्यात बराच वेळ भेट झाली. विधानपरिषद निवडणुकीतील बंडखोरीबाबत यावेळी चर्चा झाली. विधान परिषदेच्या 17 जागांवर भाजप व राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. बंडखोरांना थंड करण्यासाठी दोन्ही प्रदेशाध्यक्षांमध्ये चर्चा झाली.
Sunil Tatkare: मला विश्वास आहे निवडणूका सुरळीत पार पडतील
दरम्यान, भेटीनंतर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले कि, महायुतीच्या जागेंबाबत चर्चा आज होती. कोकण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. त्यानुषंगाने चर्चा झाली आहे. 17 जागांवर सामंजस्य करण्याबाबत चर्चा झाली आहे. मला विश्वास आहे निवडणूका सुरळीत पार पडतील. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. दळवीबाबत योग्य मार्ग निघेल. असेही ते म्हणाले.
आणखी वाचा