Latur Re NEET Result : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मोटगावकरांच्या ‘RCC’ची री-नीट निकालात भरारी; 550 विद्यार्थ्यांना 530 हून अधिक गुण


RCC Latur Re NEET Result : देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे केंद्रस्थान ठरलेल्या लातूरमधून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले शिवराज मोटेगावकर यांच्या ‘आरसीसी कोचिंग क्लासेस’ने (RCC) री-नीट (Re-NEET) परीक्षेत उल्लेखनीय निकाल नोंदवला आहे. आरसीसीमधील 2,200 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 36 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवले असून, 530 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे साडेपाचशेच्या घरात आहे.

नीट पेपरफुटीच्या महाघोटाळ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही री-नीट परीक्षा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली होती. या काळात केंद्रीय तपास यंत्रणांचे (CBI) आणि प्रशासनाचे विशेष लक्ष लातूरमधील परीक्षा केंद्रांवर होते. अशा कठीण परिस्थितीतही आरसीसीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे शैक्षणिक वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Shivraj Motegaonkar Arrest : संचालक जेलमध्ये, शिक्षकांनी सांभाळली धुरा

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानंतर सीबीआयने मोठी कारवाई केली होती. या प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर यांच्यासह सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि एजंट डॉ. मनोज शिरुरे यांना सीबीआयने अटक केली होती. मुख्य संचालक सीबीआयच्या कोठडीत असतानाही संस्थेतील सुमारे 40 शिक्षकांनी गेल्या दीड महिन्यापासून खचून न जाता विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या या जिद्दीमुळेच हा निकाल शक्य झाल्याचे मत आरसीसीमधील जीवशास्त्राचे शिक्षक डॉ. राजू वानरे यांनी व्यक्त केले.

Re NEET Exam Latur : कडक सुरक्षेत लागला निकाल

पेपरफुटीच्या डागामुळे लातूरच्या ट्युशन आणि कोचिंग जगताची देशभरात मोठी बदनामी झाली होती. त्यामुळे री-नीट परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांवरही प्रचंड मानसिक दडपण होते. मात्र, आरसीसीच्या साडेपाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी 530 पेक्षा जास्त गुण मिळवून वैद्यकीय प्रवेशाच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत केले आहे. संचालक जेलमध्ये असताना शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेली गुणवत्ता आता चर्चेचा विषय ठरत आहे.

ही बातमी वाचा:

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *