बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण


पुणे : देशात एकीकडे नीट (NEET) पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना दुसरीकडे री-नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये, बारामतीची (Baramati) श्रावणी कुदळे नीट परीक्षेमध्ये देशात पाचवी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. पहिल्याच प्रयत्नात श्रावणी कुदळेने हे घवघवीत यश संपादन केल्याने तिचे आई-वडील देखील आनंदी आहेत. कृष्णा कुदळे आणि जयश्री कुदळे हे तिचे आई-वडिल जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत. मुलीने इतकं मोठं यश संपादन करेल असं वाटलं नव्हतं तिने यश संपादक केलं, त्याचं कौतुक होतय असे तिच्या पालकांनी म्हटले. तसेच, उपमुख्यमंत्री तथा बारामतीच्या आमदार सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांनीही फोनवरुन तिचे अभिनंदन केले.

श्रावणीने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा पास केली आहे, फक्त परीक्षाच पास नाही केली तर श्रावणी देशात पाचवी तर मुलींमध्ये देशात पहिली आली आहे, विशेष म्हणजे ती राज्यात पहिली आली आहे. श्रावणीने 720 पैकी तिने 710 मार्क मिळवले आहेत. बायोलॉजी मध्ये 360 पैकी 360 मार्क, केमिस्ट्री मध्ये 180 पैकी 175 तर फीजिक्स 180 पैकी 175 मार्क मिळाले आहेत. श्रवणीने रोज कॉलेज वगळता रोज 6 तास अभ्यास केला आहे. तसेच अनेक आवडी निवडीला तिला आळा घालावा लागला. आठवीत असताना तिने डॉक्टर व्हायचे ठरवले होते. तसेच पहिली परीक्षा देताना पेपर लिक झाला त्याचा तिला अजिबात त्रास झाला नाही, असेही तिने सांगितले.  

श्रावणीच आईवडील पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत..आज श्रवणीने जे यश मिळालं आहे, त्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. श्रावणी ही मूळची दौंड तालुक्यातील खडकी गावाची पण तिने अभ्यास हा बारामतीतील अकॅडमीत केला, तिच्याबद्दल तिचे शिक्षक भरभरून बोलतात. अवघड अशा नीट परीक्षेत श्रावणीने घवघवीत यश संपादित केलं आहे. तिला आता डॉक्टर बनायचं आहे, ती आता पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जाणार असून तिला डॉक्टर बनून देशसेवा करायची आहे. लहानपणी अनेक जण डॉक्टर व्ह्यायचं स्वप्न बघतात अन् कालांतराने ते स्वप्न बाजूला पडते. मग ते नवीन स्वप्नाच्या मागे पळतात. सातवीत असल्यापासून श्रावणीने नीटची तयारी केली, आज तिच्या कष्टाचे चीज झालं. श्रावणी देशात ती पाचवी आली.. श्रावणी आता डॉक्टरकीचा अभ्यास करणार आहे. 

सुनेत्रा पवारांचा श्रावणीला फोन

श्रावणीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी श्रावणी कुदळे हिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रावणीच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या तिच्या शिक्षकांचेही अभिनंदन केले. तसेच, “दिवंगत लोकनेते अजितदादा पवार आज आपल्यात असते, तर त्यांनाही तुझ्या या यशाचा खूप अभिमान वाटला असता. त्यांचे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत,” अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मोटगावकरांच्या ‘RCC’ची री-नीट निकालात भरारी; 550 विद्यार्थ्यांना 530 हून अधिक गुण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *