Vat Purnima 2026: 29 जूनच्या वटपौर्णिमेला जुळणार पॉवरफुल शुभ योग! 5 राशींचं भाग्य फळफळणार, तिथी, शुभ योग, पूजेचा शुभ मुहूर्त…


Vat Purnima 2026 Shubh Yog: वैदिक पंचांगानुसार, यंदा वटपौर्णिमा हा सण 29 जून रोजी येत आहे, विवाहित महिलांसाठी खास तसेच हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटवृक्षाची पूजा करून व्रत करतात. वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून, कुटुंबातील नातेसंबंध दृढ करण्याचा, परस्पर आदर आणि निष्ठेचा संदेश देणारा सण आहे. या दिवशी शिव-पार्वतीचे स्मरण, वटवृक्षाची पूजा आणि सत्यवान–सावित्रीच्या कथेचे वाचन किंवा श्रवण करण्यालाही विशेष महत्त्व दिले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची वटपौर्णिमा अत्यंत खास आहे, या दिवशी एक अत्यंत शक्तिशाली आणि दुर्मिळ योग जुळून येतोय. जाणून घ्या कोणता शुभ योग जुळून येतोय, आणि भाग्यशाली राशी कोणत्या? जाणून घ्या…

वटपौर्णिमा 2026 शुभ योग…(Vat Purnima 2026 Shubh Yog)

वैदिक पंचांगानुसार, यंदा सोमवार, 29 जून 2026 रोजी उदयतिथीनुसार वटपौर्णिमा साजरी होत आहे. सोमवार हा दिवस भगवान शिव यांना समर्पित असल्याने आणि पौर्णिमा तिथीचा संयोग आल्याने या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहे. वटपौर्णिमा यंदा सोमवारी येत असल्याने चंद्र आणि भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी वटवृक्षाची पूजा, शिव-पार्वतीची आराधना आणि सत्यवान–सावित्रीचे स्मरण विशेष फलदायी मानले जाते.

वटपौर्णिमा तिथी आणि सोमवार यांचा दुर्मिळ संयोग…

पंचांगानुसार, पौर्णिमेला  चंद्र पूर्ण कलांनी युक्त असल्याने मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा दिवस शुभ मानला जातो.
वडाच्या वृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करण्याची परंपरा आहे.

पूजेचा शुभ मुहूर्त

वैदिक पंचांगानुसार, 29 जून २०२६ रोजी सकाळी 06:30 ते दुपारी 12:30 या वेळेत वटपौर्णिमेची पूजा करणे शुभ मानले जाते.

भाग्यशाली राशी

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राच्या प्रभावामुळे मानसिक समाधान मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. धनलाभाचे योग आहेत.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, मान-सन्मान वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतात.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, भागीदारीतील कामे यशस्वी होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुखद अनुभव मिळतील.

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि शुभ वार्ता मिळू शकते.

हेही वाचा :

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा पूजेचा ‘हा’ शुभ मुहूर्त, फक्त ‘हे’ 2 तास टाळा! तिथी, महत्त्व, पूजा पद्धत, पारंपारिक समजूत…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *