Vaibhav Sooryavanshi : संपूर्ण मालिकेत पन्नाशीसाठी तरसणारा वैभव आज फायनलमध्ये श्रीलंकेचा गेम करणार?, LIVE सामना कुठे अन् कधी पाहायचा? जाणून घ्या A टू Z


IND-A vs SL-A LIVE streaming Tri-Nation Series 2026 Final : इंडिया ए संघाने तिंरगा मालिकेत (Try-Series) वादळी कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज या मालिकेचा महामुकाबला म्हणजेच फायनल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर खिळल्या आहेत. या मालिकेत वैभवला आतापर्यंत अर्धशतक (Fifty) झळकावता आलेले नाही, त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध एक मोठी खेळी करण्याच्या इराद्याने तो मैदानात उतरेल.

सामना किती वाजता सुरू होणार? (IND-A vs SL-A LIVE streaming Tri-Nation Series 2026 Final)

भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या तीन देशामध्ये खेळवल्या जाणाऱ्या या तिंरगा मालिकेचा अंतिम सामना आज दांबुला येथील रंगिरी दांबुला इंटरनेशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दोन्ही कर्णधार सकाळी 9:30 वाजता टॉससाठी मैदानात उतरतील. म्हणजेच, ठीक 10 वाजेपासून वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसेल.

‘लाईव्ह’ सामना कुठे पाहायचा? (IND-A vs SL-A LIVE streaming Tri-Nation Series 2026 Final)

या तिंरगा मालिकेतील इतर सामन्यांप्रमाणेच अंतिम सामनाही तुम्ही सोनी नेटवर्क (Sony Network) वर लाईव्ह पाहू शकता. तुम्हाला सोनी स्पोर्ट्स (Sony Sports) चॅनेल लावायचे आहे. जर तुम्हाला मोबाईल किंवा ओटीटीवर सामना पाहायचा असेल, तर तुम्ही सोनी लिव (SonyLIV) ॲपवर या सामन्याचा आनंद घेऊ शकता. तसेच या सामन्याशी संबंधित सर्व लाईव्ह अपडेट्स, बातम्या आणि रेकॉर्ड्स तुम्ही https://marathi.abplive.com/sports च्या अधिकृत संकेतस्थळावर वाचू शकता. आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडिया हा किताब जिंकून इतिहास रचणार का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू (Playing Squads)

इंडिया ए संघ : प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, निशांत सिंधू, विप्रज निगम, अनुकूल रॉय, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुष बदोनी, प्रभसिमरन सिंग, युद्धवीर सिंग चरक, अर्शद खान, अशोक शर्मा.

श्रीलंका ए संघ : निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), अविष्का फर्नांडो, नुवानिदु फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, सहान अराचिगे (कर्णधार), अहान विक्रमसिंघे, रविंदु फर्नांडो, वानुजा सहान, विजयकांत वियास्कंथ, दुलज समुदिथा, कुगाथास मथुलन, विशेन हलंबगे, गरुका संकेत, चमिका गुणसेकरा, मोहम्मद शिराज, चमिका करुणारत्ने.

लीग स्टेजमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली?

यजमान श्रीलंका अ संघाने लीग स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी 4 पैकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे, भारत अ संघाने 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवत दुसरे स्थान मिळवले. अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिल्याने त्याचे फायनलचे तिकीट हुकले.

हे ही वाचा –

India vs Afghanistan, 3rd ODI: टीम इंडियाची अफगाणविरुद्ध ‘यशस्वी’ शतकाने सांगता, हिटमॅन सुद्धा तळपला, प्रसिद्ध कृष्णाने पाच विकेट घेत कंबरडं मोडलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *