Ganpatipule Drowning Accident : गणपतीपुळ्याची ट्रिप ठरली अखेरची; समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या 5 तरुणांचा करुण अंत; छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन गावावर शोककळा


Ganpatipule Drowning Accident News : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे (Ganpatipule) येथे अपघाताची घटना घडली आहे. यात समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले 5 तरुण बुडाले आहेत. मिळलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) जिल्ह्यातील बिडकीन येथून 19 तरुणांचा एक गट कोकणात गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी सकाळी देवदर्शन झाल्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास यातील काही तरुण समुद्रात पाण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले. मात्र, समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा योग्य अंदाज न आल्याने पाच जण अचानक अचानक समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले. परिणामी या बुडालेल्या आणखी दोघांचे मृतदेह सापडले असून आतापर्यंत एकूण तिघांचे मृतदेह सापडले आहे. (Ganpatipule Drowning Incident)

मिळालेल्या माहितीनुसार, यश कांबळे आणि अनिकेत हिवराळे यांचे मृतदेह शनिवारी रात्री उशिरा सापडले आहेत. तर प्रेम आदमानेचा संध्याकाळच्या सुमारास मृतदेह सापडला होता. तर आदित्य राऊत आणि आनंद नरवडे हे दोघे अजूनही बेपत्ता असून अद्याप शोधकार्य सुरूच आहे.

Chhatrapati Sambhajinagar : बिडकीन गावावर शोककळा

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होईल पुढील कारवाई सुरु केली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी यांनी तातडीने गणपतीपुळे येथे धाव घेतली. सध्या तटरक्षक दलाच्या मदतीने बेपत्ता तरुणांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. सर्व तरुण बिडकीन येथील असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *