Aadhesh Bandekar Home Minister: 2004 साली सुरू झालेल्या ‘होम मिनीस्टर’ (Home Minister) मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात आणि घरात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. या मालिकेनं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महिलांच्या मनात घर तयार केलं. अभिनेता आणि होस्ट आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या कार्यक्रमाने 2024 साली निरोप घेतला होता. तब्बल 20 वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. महाराष्ट्रातील वहिनी आवर्जून आदेश बांदेकर यांना घरी बोलवायच्या. या मालिकेनं अनेक कुटुंबांना एकत्र आणलं. हा शो बंद झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता भाऊजी पुन्हा एकदा वहिनींच्या भेटीस येणार आहे. होम मिनिस्टरचा प्रोमो झी मराठी वाहिनीने नुकताच सोशल मीडियात शेअर केला आहे.
‘होम मिनीस्टर’चा दुसरा पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (Zee Marathi Aadesh Bandekar Marathi Show Home Minister)
‘होम मिनीस्टर’ या सदाबहार कार्यक्रमाचा दुसरा पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या पर्वाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या शोमधून आदेश बांदेकर पुन्हा एकदा दमदार कमबॅक करणार आहेत. प्रोमोमध्ये आदेश बांदेकर ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत एका साडीच्या दुकानात जातात. तिथे जाऊन आदेश बांदेकर पैठणी निवडतात. बऱ्याच पैठणी सिलेक्ट करुन त्या पॅक करायला सांगतात. ‘माझी तर तयारी झाली आहे, वहिनी लवकरच येतोय तुमच्या घरी…’, असं आदेश भावोजी म्हणतात.
आदेश बांदेकर यांच्या ‘होम मिनीस्टर’च्या दुसऱ्या पर्वाच्या प्रोमोला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी कमेंट करुन या शोची आतुरतेने वाट पाहत असल्याचं सांगितलं. या प्रोमोवर आदेश बांदेकर यांची सून अभिनेत्री पुजा बिरारी हिनं देखील कमेंट केली आहे. तिनं हार्ट इमोजी कमेंट करुन शो सुरु होण्याचा आनंद व्यक्त केला आहे. सध्या तिची कमेंट देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
तर, आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याने या कार्यक्रमाचा प्रोमो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. ‘श्री स्वामी समर्थ.. खूप वर्षांनी बाबांना ऑनस्क्रीन पाहून खूप आनंद होतोय.. खरंतर Fathers डेचं मलाच गिफ्ट मिळालं आहे’, असं त्यानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, हा शो कधी पाहायला मिळणार? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
रेवती सुळेच्या लग्नात स्वतःच्याच गाण्यावर शाहरुख थिरकला; सुप्रियांच्या जावयाला गोड गोड पापा…
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष