Sanjay Raut on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शनिवारी कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यासंदर्भातील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. भाषणादरम्यान अमित शाह यांनी प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा उल्लेख करताना ते म्हणाले, “शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.” पुढे बोलताना शाह म्हणाले, “पूर्वी एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना ‘शिवसेना शिंदे गट’ असे म्हणावे लागत होते. मात्र आता कोणताही गट उरलेला नाही. आता एकच शिवसेना आहे.” अशा शब्दांत त्यांनी चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सूचक टिप्पणी केली. दरम्यान, अमित शाह यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
संजय राऊत म्हणाले की, अमित शाह शिवसेना प्रमुखांचा आणि शिवसेनेचा अपमान करत आहेत. मिंधेंचा उल्लेख करणं म्हणजे त्यांनी हा मराठी माणसाचा अपमान केला आहे. एकनाथ शिंदे ही अमित शाह यांची टेस्टट्यूब बेबी आहे. या बेबीला चार वर्ष झाली आहेत. अमित शाह सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झाले आहेत का? तुमच्या दबावामुळे सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. त्यांच्या दबावामुळेच पक्षाचे चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाने शिंदेना दिलं आहे. अमित शाहांच्या पोटातलं विष ओठावर आलं. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना दिली आहे, असा घणाघात त्यांनी केलाय.
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाह मोदींना आव्हान देणारे षडयंत्र रचताय
संजय राऊत पुढे म्हणाले की, वर्षभरात अराजकता निर्माण होणार आहे. अमित शाह यांचा मूळ व्यवसाय हा शेअर मार्केटमधे पैसा गुंतवणे आणि कमावणे आहे. ते मोदींना आव्हान देणारे षडयंत्र रचत आहेत, त्यात एकनाथ शिंदे यांना त्यांनी सोबत घेतलं आहे. सर्व खासदार तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत आहेत. ओम बिर्ला यांच्याकडून अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत. अद्याप मिंधेंकडे ते खासदार आहेत याबाबत ते बोलले नाहीत. काही खासदार संपर्कात आहेत, कारण त्यांच्या मतदारसंघात त्यांना भीती वाटत आहे. ईशान मुंबईच्या खासदाराने बेईमाने केली आहे. आज ते बैठक घेणार आहेत, असे म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगरवर भाष्य केले.
आणखी वाचा
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे