Maharashtra Rain Updates: राज्यातील 15 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; मुंबई, रत्नागिरी, पुणे, सोलापूरमध्ये मुसळधार, पावसाचे A टू Z अपडेट्स


Maharashtra Rain Updates: राज्यात 15 जिल्ह्यांना आज हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्टचा  (Rain Yellow Alert) इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Updates)

मराठवाड्याला देखील ‘यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह वादळ होण्याची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Updates)

तळकोकणात भात लावणीला सुरुवात, पावसाची मात्र दडी (Konkan Rain Updates)

सिंधुदुर्गात मान्सूनच्या आगमनानंतर दडी मारलेल्या पावसाने पुनरागमन केलं खरं, पण दोन दिवस पाऊस झाल्यानंतर पुन्हा पावसाचे पाठ फिरवली आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात ऊन पडत आहे. मात्र शेतकऱ्यांनी लावणी योग्य आलेल्या भाताच्या रोपांची लागवड करायला सुरुवात केली आहे. कारण भाताच्या रोपांची 21 दिवसानंतर लावणी केली जाते, हा कालावधी वाढला तर उत्पादनात घट होते. म्हणून भाताच्या रोपांची लागवड सुरू केली आहे. भात लावणीला हवा तसा पाऊस झाला नसला तरी नदीचे पाणी उपसा करून भाताची रोप लागवड केली जात आहे.

उदगीर तालुक्यात खरीप पेरणीला वेग- (Latur Rain News)

उदगीर तालुक्यातील अनेक भागात दोन दिवसांपूर्वी समाधानकारक झालेल्या पावसानंतर खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. अनेक गावांमध्ये शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने शेतकरी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरीसह विविध पिकांच्या पेरणीत व्यस्त झाले आहेत. पावसाच्या प्रतीक्षेमुळे यंदा पेरणी काही दिवस लांबणीवर पडली होती. मात्र, झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या असून, ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करून मोठ्या प्रमाणावर पेरणी सुरू करण्यात आली आहे. वेळेवर झालेल्या या पावसामुळे बियाण्यांची उगवण चांगली होण्यास मदत होणार असून, पुढील काही दिवसांतही समाधानकारक पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम चांगला जाण्याची अपेक्षा आहे. कृषी विभागाने हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शिफारशीनुसार बियाणे, खतांचा वापर करावा आणि पेरणीनंतर पिकांची आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.पावसाच्या दिलास्यानंतर उदगीर तालुक्यात खरीप हंगामाला नवचैतन्य मिळाले आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Rain Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कुठे कसे असेल हवामान, IMDचा अंदाज काय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *