Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या ‘हिंदू राष्ट्रा’वरही सवाल


Uddhav Thackeray Slams Modi Government : हे सरकार आपल्याला रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही. त्यामुळे हे दळभद्री सरकार आता बदललंच पाहिजे. तुम्ही सर्वांनी आता केवळ कार्यकर्ते न राहता नेते व्हा आणि हे सरकार बदला. आज तुमच्यात जी आग दिसत आहे, ती आग हे सरकार बदलेपर्यंत पेटती राहिली पाहिजे आणि या हुकूमशाही सरकारला तिने भस्म केलं पाहिजे. या लोकांनी तुमचं भवितव्य चोरलं आहे, अशा अत्यंत कडक आणि आक्रमक शब्दांत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये एक आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. त्याचसोबत ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही टीका केली. 

Uddhav Thackeray On Sonam Wangchuk : ‘लष्करासाठी काम करणारे वांगचुक देशद्रोही कसे?’

सोनम वांगचुक यांच्या कार्याचा गौरव करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “सोनम वांगचुक यांनी या देशाला काय दिलं आणि या दळभद्री सरकारने देशाला काय दिलंय, याचा हिशोब एकदा होऊनच जाऊ दे. बर्फामध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी वांगचुक यांनी ‘सोलर कॅम्प’ बनवून दिले. लडाखमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असताना त्या ठिकाणी कृत्रिम ‘आइस माउंटेन’ ज्यांनी बनवले, आज त्याच सोनम वांगचुक यांना हे सरकार देशद्रोही 
आणि चीनचे हस्तक ठरवत आहे.”

Thackeray Target RSS Dattatreya Hosabale : पाकिस्तान चर्चेवरून संघावर निशाणा

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दत्तात्रेय होसबळे आणि मोहन भागवत यांच्या विधानांचा दाखला दिला. “पाकिस्तानबरोबर भारताने चर्चा केली पाहिजे, असं वक्तव्य संघाच्या होसबळे यांनी केलं होतं आणि त्यावर मोहन भागवत यांनीही संमती दर्शवली होती. जे लोक आपल्या सैनिकांच्या जीवावर उठले आहेत, त्या पाकिस्तानसोबत चर्चेसाठी हे तयार आहेत; पण जो व्यक्ती आपल्या लष्करासाठी आणि देशासाठी अहोरात्र काहीतरी करतोय, त्याच्याशी मात्र हे सरकार चर्चेला तयार नाही. आज जे काही देशामध्ये सुरू आहे, ते संघाच्या कल्पनेतील ‘हिंदू राष्ट्र’ आहे का?” असा थेट प्रश्न त्यांनी मोहन भागवत यांना विचारला.

Uddhav Thackeray On Anna Hazare : मनमोहन सिंग आणि मोदी सरकारची तुलना

काही वर्षांपूर्वी झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची आठवण करून देत ठाकरे म्हणाले की, “अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले होते, तेव्हा त्यांना देशभरात मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी त्यांना कोणीही देशद्रोही किंवा चीनचा हस्तक म्हटले नव्हते. उलट, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी अण्णांशी सन्मानाने चर्चा करण्यासाठी विलासराव देशमुखांना पाठवले होते. मात्र, आजच्या सरकारकडून दडपशाही सुरू आहे.”

Thackeray Challenges PM Modi : ‘तुमच्या पापाचा कोंबडा लवकरच आरवणार!’

सरकारवर घणाघात करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “चादरीने तुम्ही जरी वांगचुक यांचे आंदोलन झाकण्याचा प्रयत्न केला, तरी सत्य कधीही लपत नाही. तुमच्या पापांवर आता पांघरूण घालता येणार नाही, तुमचा पापाचा कोंबडा लवकरच आरवणार आहे. मोदी सरकारने हिंमत असेल तर आता निवडणुका जाहीर कराव्यात, आम्ही सर्व ताकदीने लढायला तयार आहोत,” असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *