Latur News : रेणापूर येथील बेंगलोर अय्यंगार्स बेकरीचा परवाना अन्न सुरक्षा विभागाने निलंबित करुन अन्न उत्पादन व विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. तपासणीत बेकरीमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे, तसेच मुदतबाह्य कच्चा माल वापरला जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे जनआरोग्याच्या दृष्टीने बेकरी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तरीही बेकरी सुरु असल्याचे समोर आले. त्यामुळं प्रशासनाने रेणापूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आदेश असल्यानंतर सुद्धा 18 जुलै रोजी बेकरी सुरू असल्याची बातमी एबीपी माझा प्रसारित केली होती. त्यानंतर आज म्हणजे 19 जुलै रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीत हे समोर आले. यावेळी दुकानात अन्नपदार्थांचे उत्पादन सुरू असल्याचेही निदर्शनास आले. यानंतर सहाय्यक आयुक्त (अन्न), लातूर यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत बेकरीचे व्यवस्थापक शिद्राया रविंद्र बंडार आणि नोंदणीकृत मालक नंदकुमार सी. यांनी शासनाच्या बंदच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 अंतर्गत रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
बोरिवली पश्चिमेतील फळ विक्रेत्याच्या दुकानाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल
बोरिवली पश्चिमेतील फळ विक्रेत्याच्या दुकानाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये फळांवर उंदीर ताव मारताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना विकल्याचा सोशल मीडियावर आरोप करण्यात आला आहे.
प्लेग, लेप्टोस्पायरोसिससारख्या आजारांचा धोका असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. यापूर्वी फळांना चमक आणण्यासाठी घातक रसायने वापरल्याचे आणि गटाराच्या पाण्यात फळे-भाज्या धुतल्याचे प्रकारही चर्चेत आहेत. व्हिडिओची सत्यता आणि संबंधित दुकानाची ओळख तपासण्याचे काम सुरु आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक प्रशासनाकडून पडताळणी सुरु आहे. .
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम