Toxic Teaser: कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. ‘टॉक्सिक’ सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? ‘त्या’ 4 अभिनेत्री कोण?


Yashs Toxic New Teaser Release: सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक’ (Toxic) सिनेमाची सध्या क्रेझ पाहायला मिळत आहे. बहुप्रतिक्षित गँगस्टर  अॅक्शन ड्रामा सिनेमात भयंकर सीन्स असणार (Superstar Yash) आहेत. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचा अॅक्शन पॅक  टीझर (teaser) रिलीज झाला होता.  सिनेमाचा टीझर पाहून अनेकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली. आता या सिनेमाचा दुसरा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टीझरमधून सिनेमातील अभिनेत्रींचा (Entertainment) चेहरा उलगडण्यात आला आहे.  या सिनेमाच्या फिल्म मेकर्सने ‘लेडीज अँड लेडीज’ या नावाने टीझर प्रदर्शित केला आहे.   या सिनेमात किती अभिनेत्रींनी आपला जलवा दाखवला आहे, चला जाणून घेऊयात.

यशचा ‘टॉक्सिक’ सिनेमाचा टीझर रिलीज (Toxic Teaser Raises Excitement)

1 मिनिट 41 सेकंदांचा या टीझरची सुरुवात मजेशीर डिस्क्लेमरने होते.  सुरुवातीला एक रोमँटिक सीन दाखवण्यात आला आहे.   यश आणि कियारा अडवाणी यांचा बीचवरील रोमँटिक सीन दाखवण्यात आला आहे. या एका महिलेचा आवाज ऐकू येतो. ती महिला प्रेमाची व्याख्या सांगते, ती म्हणते, ‘प्रेम.. प्रेम स्त्रियांना राक्षस बनवते. हा एक सुंदर धोका आहे,  जर कुणी याची खोली आणि फसवणूक समजून घेतली तर…आणि तरीही आपण इथे आहोत. थोड्याशा प्रेमासाठी लढत आहोत.  लेडीज अँड लेडीज.. ‘

यानंतर टीझरमध्ये नयनतारा बाईक चालवताना दिसते. कियारा अडवाणी सर्कसमध्ये दिसते.   तारा सुतारिया एका बारमध्ये उभी असलेली दिसते. तर, अभिनेत्री रुक्मिणी वसंत हातात बंदूक घेऊन एका दमदार पोझमध्ये दिसते.  तसेच हुमा कुरेशीचीही झलक आपल्याला पाहायला मिळत आहे.   यशचीही या टीझरमध्ये झलक पाहायला मिळते.   यशचे पात्र काही महिला फायटर्ससोबत लढाई करतात. अभिनेता महिला फायटर्सना बघून म्हणतो, ‘लेडीद अँड लेडीज..तुम्ही एक – एक करुन  येणार की, सगळे एकत्र येणार…?’.

पॉवरपॅक अॅक्शनने भरलेला या टीझरमध्ये यशचा राऊडी अवतार दाखवण्यात आला आहे.   टीझरच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर देण्यात आला आहे. यात ‘मुलांना दूर राहा. पालकांनो खात्री करा तुमची मुले दूर राहतील. आजी आजोबांनी त्यांची मुलं दूर राहतील याची खात्री करावी..तर पणजोबांनी आपल्या रिस्कवर हा टीझर पाहावा…’, असे टीझरमध्ये लिहिण्यात आले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘हडळ’, ‘काळी जादू करणारी’..; अभिनेत्रीवर होता सुशांत सिंह राजपूतला संपवण्याचा आरोप, सुंदर असूनही इंडस्ट्रीत काम मिळेना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *