August Upcoming Films: ऑगस्ट महिना चित्रपटप्रेमींसाठी खास ठरणार आहे. या महिन्यात एकापेक्षा एक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिसवर मोठे क्लॅश पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला सनी देओल आणि इमरान हाश्मी यांची टक्कर होणार आहे, तर दुसरीकडे श्रद्धा कपूर आणि यश यांच्यातही स्पर्धा रंगणार आहे. चला जाणून घेऊया, ऑगस्ट महिन्यात थिएटरमध्ये कोणते चित्रपट रिलीज होणार आहेत.
‘बंटवारा 1947’
हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनी देओल, प्रीती झिंटा आणि करण देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करत आहेत. देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेला हा चित्रपट असणार आहे.

‘आवारापन 2’
इमरान हाश्मी आणि दिशा पाटनी यांची मुख्य भूमिका असलेला हा रोमँटिक-अॅक्शन चित्रपट आहे. हा चित्रपटही 14 ऑगस्ट रोजीच प्रदर्शित होणार आहे.

‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’
हा चित्रपट 7 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसतील.
‘ईठा’
28 ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. हा महिला-केंद्रित चित्रपट असून त्याचा टीझर आधीच प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

‘टॉक्सिक’
26 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात यश मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत, कियारा अडवाणी आणि नयनतारा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे.

‘नागजिला: नाग लोक का पहला कांड’
या सुपरनॅचरल चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपटही 14 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

‘लव्ह अँड वॉर’
संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. चित्रपट पुढे ढकलला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा