ODI : वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, 12 जुलैला पहिला सामना, कुणाला संधी? – Marathi News | Wi vs nz new zealand announced 16 members squad for odi series against west indies see schedule and venue


न्यूझीलंड क्रिकेट टीमने यजमान इंग्लंडला त्यांच्या घरात लोळवलं. न्यूझीलंडने इंग्लंड विरुद्धची 3 सामन्यांची कसोटी मालिका ही 2-1 फरकाने जिंकली. त्यानंतर इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध मायदेशात 1 जुलैपासून 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड वेस्ट इंडिज विरुद्ध 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड निवड समितीने या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंड क्रिकेटकडून सोशल मीडियद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 12 ते 22 जुलै दरम्यान या 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. मिचेल सँटनर हा या मालिकेत न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील 5 पैकी पहिले 3 सामने हे एकाच मैदानात होणार आहेत. तर उर्वरित आणि शेवटचे 2 सामनेही एकाच स्टेडियममध्ये होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

विंडीज विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून न्यूझीलंड संघात वेगवान गोलंदाज जेकब डफी याचं पुनरागमन झालं आहे. तसेत मेजर क्रिकेट लीग स्पर्धेमुळे न्यूझीलंडचे मुख्य खेळाडू या मालिकेत खेळणार नाहीत. तसेच एका खेळाडूला एकदिवसीय मालिकेत पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.

मॅट फिशरला पहिल्यांदाच संधी

न्यूझीलंड संघात पहिल्यांदाच संधी मिळालेल्या मॅट फिशरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. मॅटने 25 सामन्यांमध्ये 43 विकेट्स मिळवल्या आहेत. मॅटने 2025 साली ऑगस्टमध्ये बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. त्यामुळे मॅट वनडे सीरिजमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विंडीज विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 12 जुलै, गयाना

दुसरा सामना, 15 जुलै,गयाना

तिसरा सामना, 18 जुलै, गयाना

चौथा सामना, 20 जुलै, बारबाडोस

पाचवा सामना, 22 जुलै, बारबाडोस

वेस्ट इंडिज विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, क्रिस्टियन क्लार्क, जेकब डफी, मॅथ्यू फिशर, डील फॉक्सक्रॉफ्ट, मिचेल हे, निक कॅली, टॉम लॅथम, जेडन लीनॉक्स, डॅरेल मिचेल, हेनरी निकोल्स, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ आणि विल यंग.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *