Bhiwandi News : भिवंडीत धक्कादायक घटना घडली आहे. विजेच्या धक्क्याने 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील तीनबत्ती परिसरातील एका दुकानात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या स्वीटच्या दुकानातील भांडी बाजूला असलेल्या मंदिरात ठेवली जात होती. ही भांडी मयत मुस्तफा घेऊन येत असताना त्याला विजेचा धक्का लागला. जखमी अवस्थेत मुस्तफा यास स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आमच्या मुलाचा मृत्यू दुकानदाराच्या हलगर्जीपना व निष्काळजीपणाने झाला असून या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मयत मुस्तफा शेख यांच्या परिवाराने केली आहे. या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चुकीच्या उपचारामुळे एका महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दुसरा महिला सिरियस आहे. ऐरोलीतील रुग्णालयात प्रसूतीसाठी दोन्ही महिला दाखल झाल्या होत्या. उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सोनम डोंगरे आहे. बाळाचाही पोटात मृत्यू झाला आहे.
भिवंडी तालुक्यातील टेंभवली खारबाव रस्त्यावर विजेची तार कोसळली रस्त्यावर
भिवंडी तालुक्यातील टेंभवली खारबाव रस्त्यावर टोरंट पावर च्या विद्युत तारेला शॉर्ट सर्किट होऊन विजेची तारेचा हळूहळू स्फोट झाल्याने विजेची तार रस्त्यावर कोसळली. त्यामुळे नागरिकांमध्ये काही वेळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाच्या कोसळधारेमुळे टेंभवली खारबाव रस्त्यावरील फिरींगपाडा गावच्या हद्दीत दुपारच्या सुमारास टोरंट पावरच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या विजेच्या तारेला शॉर्ट सर्किटमुळे आगीचे छोटे मोठे आगीचे स्फोट होऊ लागले. त्यानंतर विद्युत तारेचा स्फोट होऊन तार जमिनीवर कोसळली. त्यामुळे पाऊस सुरू असल्याने विद्युत विजेचा करंट पाण्यात उतरण्याच्या शक्यतेमुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
परभणीच्या कोल्हा गावाजवळ आयशर आणि कारचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू
परभणीच्या कोल्हा गावाजवळ आयशर आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर आयशरचा चालक जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान अपघात एवढा भीषण होता की या कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कारचा पूर्ण भाग हा चकनाचूर झाला
परभणीच्या मानवत तालुक्यातील कोल्हा येथील उड्डाण पुलाजवळ आयशर आणि एर्टिगा कारचा भीषण अपघात होऊन कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात आयशर चालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एर्टिगा कारमध्ये गणेश निर्मळ आणि माऊली निर्मळ हे दोघेजण प्रवास करत होते. त्यानंतर कार आणि पुढून येणाऱ्या आयशर मध्ये अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्ण भाग हा चकनाचूर झाला आहे. ज्यामुळे कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात आयशर चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह