3 दिवसात उत्तर द्या, सरकारची थेट Meta ला नोटीस; WhatsApp च्या ‘युझरनेम’ फीचरला मोठा ब्रेक? | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

WhatsApp Username Feature: केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी ‘मेटा’ ला नोटीस पाठवली आहे.

WhatsApp Username Feature
WhatsApp Username Feature

WhatsApp User ID:  जगातील अनेक लोक व्हॉट्सॲप वापरतात. व्हॉट्सॲपने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी युजरनेम रिझर्वेशन फीचर सुरू केले आहे. या फीचरमुळे मोबाईल नंबर शेअर न करता फक्त युजरनेमच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधता येणार असून चॅटिंग करता येणार आहे. मात्र या युझरनेम फिचरला भारतात मोठा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी ‘मेटा’ ला नोटीस पाठवली असून तीन दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक नवे फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवर चॅट करण्यासाठी मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज भासणार नाही. थेट व्हॉट्सअॅपवर ते तुमच्या नावाने म्हणजे युझरनेमने कनेक्ट राहू शकतील. व्हॉट्सअॅपने याला प्रायव्हसीच्या दृष्टीने मोठे पाऊल म्हटले असले तरी केंद्र सरकाराला मात्र या फिचरमुळे ऑनलाईन फसवणूक वाढण्याची भीती आहे. या फिचरमुळे सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ होऊ शकते, अशी भीती केंद्र सरकारला आहे. यामुळेच केंद्र सरकारने मोठे पाऊस उचलत मेटाला नोटीस पाठवली आहे.

सरकारने नोटिसीमध्ये नेमकं काय म्हटलंय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , केंद्र सरकारने व्हॉट्सॲपवर ‘युझरनेम (usernames) हे फिचर आणण्याबाबत मेटाला नोटीस बजावली आहे. एवढच नाही तर या युझरनेम फिचरबाबत सविस्तर स्पष्टीकरण तीन दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश सरकारने मेटाला दिले आहेत. या विषयावरील चर्चा किंवा सल्लामसलत पूर्ण होईपर्यंत युझरनेम फिचर सादर न करण्याचे निर्देश सरकारने मेटाला दिले आहेत.

सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता

सरकार व्हॉट्सॲपच्या आगामी युझरनेम फीचरची बारकाईने तपासणी करणार आहे. अशी चिंता व्यक्त केली जात आहे की, वापरकर्त्यांना त्यांचे फोन नंबर लपवण्याची परवानगी दिल्यास, फसवणूक करणाऱ्यांना दुसऱ्याच्या नावाने बनावट खाती तयार करून लोकांची फसवणूक करणे सोपे होऊ शकते. भारतात व्हॉट्सॲपचे 50 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. या मोठ्या वापरकर्ता वर्गाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि बनावट प्रोफाइलमुळे होणारी फसवणूक रोखण्यासाठी, सरकारला या नवीन फीचरसंदर्भात निर्णय घेतला आहे.

29 जून रोजी जगभरात युझरनेमची नोंदणी करण्यास सुरुवात

व्हॉट्सअॅपने 29 जून रोजी जगभरात युझरनेमची नोंदणी करण्यास सुरुवात केली. जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते एकसारखे किंवा मिळतेजुळते युझरनेम निवडू शकतात. अशा परिस्थितीत, जे लोक आधी आपले युझरनेम आरक्षित करतील, त्यांना त्यांच्या आवडीचे युझरनेम मिळण्याची शक्यता जास्त असेल. नवीन लोकांशी बोलण्यासाठी मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज भासणार नाही. वापरकर्त्यांची गोपनीयता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या/देश/

3 दिवसात उत्तर द्या, सरकारची थेट Meta ला नोटीस; WhatsApp च्या ‘युझरनेम’ फीचरला मोठा ब्रेक?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *