Sushma Andhare : “ओमराजेंनी फोन उचलला नाही, कैलास पाटील म्हणाले मी स्वतःची गॅरंटी देतो पण…”; सुषमा अंधारेंचा पुण्यात खळबळजनक खुलासा, विमानात कोण होतं त्यांची नावं…


पुणे: शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. त्या चर्चेवर आज शिक्कामोर्तब (Operation Tiger UBT Shivsena) झालं आहे. पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे (Operation Tiger UBT Shivsena) गट फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे, दिल्लीसह राज्यातही घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेंचे सहा खासदार दिल्लीत गेल्याची माहिती आहे, या घटनेनं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी रात्री दिल्लीला गेलेल्या विमानात नक्की कोण कोण होते याची देखील माहिती सांगितली आहे. सुषमा अंधारे यांनी म्हटले की, काल रात्री पुण्यात चार्टर आल, तानाजी सावंत त्याला लिड करत होते, नानासाहेब पाटील, अमित क्षिरसागर, जयराजे क्षीरसागर आणि ओमराजे निंबाळकर यामध्ये होते. नागेश पाटील आष्टीकर यांच्या बोलावं तेवढं थोडच आहे. त्याचबरोबर अंधारेंनी ओमराजे निंबाळकर यांना देखील फोन केल्याची माहिती त्यांनी बोलताना सांगितली आहे.

Sushma Andhare on Shivsena UBT MP: ओमराजेंना मी सकाळी फोन केला, पण…

ओमराजे रात्री पुण्यातून मध्यरात्री दिल्लीला गेल्याची माहिती आहे, याबाबत बोलताना अंधारे म्हणाल्या, ओमराजेंना मी सकाळी फोन केला, पण माझा फोन त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांच्या पाठीशी भावासारखे, सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या आमदार कैलासदादा पाटील यांना फोन केला. ते म्हणाले, ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे कैलास पाटलांच्या बोलण्यातील संधिग्धता बरीचशी बोलकी आहे, असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

Sushma Andhare on Shivsena UBT MP: संपूर्ण मोहिमेचे कॅप्टन खासदार संजय देशमुख असून वाईस कॅप्टन…

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दोन नेत्यांची थेट नाव घेत गंभीर आरोप केला आहे. त्यांनी थेट दोन खासदारांची नावे घेत म्हटलं की, या संपूर्ण मोहिमेचे कॅप्टन खासदार संजय देशमुख असून वाईस कॅप्टन नागेश पाटील आष्टीकर आहेत. पक्षात सुरू असलेल्या या हालचालींमध्ये या दोघांची प्रमुख भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. तर “नागेश पाटील आष्टीकर हे ठरवून सगळ्यांना वेड्यात काढायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वाटते की ते सगळ्यात मोठे तीसमार खान आहेत. पण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या आणि संजय देशमुख यांच्या चाललेल्या जेवणावेळी अगदी परवाच्या रात्री ओव्हरस्मार्ट बनत त्यांनी मला आणि पक्ष नेतृत्वाला केलेला कॉल हे सगळं आम्ही समजून उमजून आहोत.  या सगळ्या कॅम्पेनचे कॅप्टन संजय देशमुख तर वाईस कॅप्टन नागेश आष्टीकर आहेत,” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Shivsena UBT MP:  एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब 

तर एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आलेली आहे. १० जूनला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमधे ठाकरेंच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. रात्री ११ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला ओमराजे निंबाळकर देखील दिल्लीत उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Shivsena UBT MP:  काय आहे ‘ऑपरेशन टायगर’?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ ही चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरेंचे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. 

Shivsena news:  ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *