IND vs AFG: गिलने यशस्वी जयस्वालसाठी ओपनिंगवर सोडलं पाणी, पण तिसऱ्याच षटकात आला फलंदाजीलाImage Credit source: PTI
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा अफगाणिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली असताना एक मोठा बदल पाहायला मिळाला. कारण रोहित शर्मासोबत शुबमन गिल ओपनिंगला उतरला नाही. तर त्याची जागा यशस्वी जयस्वालने घेतली होती. यशस्वी जयस्वालसाठी शुबमन गिलने त्याची जागा सोडली आणि तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे भारताकडून उजवं डावं असं कॉम्बिनेशन मैदानात उतरलं. पण यशस्वी जयस्वाल फार काळ मैदानात घालवून शकला नाही. तिसऱ्या षटकातच शुबमन गिलला फलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागलं. यशस्वी जयस्वाल 4 धावा करून बाद झाला. मोहम्मद सलीमने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला यावर फटका मारताना यशस्वी जयस्वाल चुकला आणि बॅकफूट पॉइंटवर झेल बाद झाला. यशस्वी जयस्वालला ओपनिंगला पाठवून देखील फेल गेला. पण शुबमन गिलने ओपनिंग सोडली ही मोठी गोष्ट आहे.
शुबमन गिलने दाखवलं मोठं मन
टीम इंडियाचा वनडे कर्णधार शुबमन गिलने ओपनर म्हणून आपली छाप सोडली आहे. मागच्या सामन्यात त्याने शतकाच्या दिशेने कूच केली होती. पण त्याआधीच संघाचा विजय झाला. शुबमन गिलने 66 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 84 धावा केल्या होत्या. ओपनिंगला चांगली फलंदाजी करून शुबमन गिलने यशस्वी जयस्वालसाठी मोठं मन दाखवलं. शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याची ही काय पहिली वेळ नाही. या स्थानावर त्याने सहा वेळा फलंदाजी केली असून त्याने जवळपास 60च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने या क्रमांकावर एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं आहे. तर ओपनर म्हणून 57 वनडे सामने खेळले आहे. त्यात 7 शतक आणि 17 अर्धशतकं ठोकली आहेत.
रोहित शर्माचं अर्धशतक चुकलं
रोहित शर्मा या सामन्यात पूर्णपणे लयीत दिसला. मागच्या सामन्यात धावचीत झाल्याने स्वस्तात बाद झाला. त्यामुळे या सामन्यात त्याने चांगली सुरूवात केली. पण त्याचं अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. रोहित शर्माने 39 चेंडूत 48 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकार मारले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशन मैदानात उतरला आहे. शुबमन गिल आणि इशान किशनची जोडी जमली आहे. तर शुबमन गिलने अर्धशतक पूर्ण केलं असून शतकाच्या दिशेने कूच केली आहे.