पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी इतक्या अभिनेत्रींना अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात आणि… तिसरीबद्दल जाणून व्हाल अवाक् – Marathi News | Pakistan former pm imran khan love life with rekha shabana azmi zeenat aman


पाकिस्तान माजी पंतप्रधान आणि क्रिकेट टीमचे कॅप्टन इमरान खान यांचं बॉलीवूड कनेक्शनची एकेकाळी चर्चा होती. बॉलीवूडमधील अनेक जण हे इमरान खान यांचे चाहते होते. इतकंच नाही, तर इमरान खान यांचं अभिनेत्री रेखा आणि जीनत अमान यांच्यासह अनेक बॉलीवूड एक्ट्रेससह अफेयर्स असल्याची चर्चा होती. रेखा यांच्यासोबत तर इमरान यांचं लग्न देखील होणार होतं.. अशा देखील चर्चा होत्या, रेखा यांच्या आईने देखील दोघांच्या नात्याचा स्वीकार केलेला. पण इमरान यांनी लग्नाला नकार दिला. काही काळासाठी मला रेखा यांचा सहवास आवडला होता. आम्ही एंजॉय केलं आणि स्वतःच्या मार्गाला लागलो… असं इमरान एका मुलाखतीत म्हणालेले… तर जाणून घ्या किती भारतीय अभिनेत्रींना इमरान खान यांनी डेट केलं होतं.

इमरान खान आणि मुनमुन सेन

इमरान खान आणि मुनमुन सेन यांच्या मैत्रीबद्दल अनेक अफवा पसरलेल्या… इमरान खान आणि बंगाली अभिनेत्री मूनमून सेन यांच्या मैत्रीने बरीच चर्चा घडवून आणली होती. असं देखील मानलं जातें की, इमरान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते.

झीनत आणि इमरान खान

झीनत आणि इमरान खान यांच्या नावाची देखील एकेकाळी तुफान चर्चा रंगली आहे. असं देखील म्हटलं जातं की, झीनत यांचं इमरान यांच्यावर प्रचंड प्रेम होतं. तेव्हा इमरान खान यांनी आपला वाढदिवस झीनत अमान यांच्यासोबत साजरा केल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.
त्या वर्षी पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. जेव्हा ते दोघे पहिल्यांदा भेटले, तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मिळालेल्या माहितीनुसार, इमरान आणि झीनत लंडनमध्येही अनेकदा भेटले होते.

इमरान खान आणि रेखा

70 – 80 च्या दशकात रेखा हिंदी सिनेविश्वावर राज्य करत होत्या. याचदरम्यान, रेखा आणि इमरान खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. दाव्यानुसार, इमरान यांनी रेखा यांच्यासोबत मुंबईत क्वालिटी टाइम घालवला आणि दोघेही जवळपास एक महिना एकत्र राहिले मुंबईच्या बीचवर अनेकदा दोघांना स्पॉट करण्यात आलं. रेखा आणि इमरान यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

इमरान खान शबाना आझमी

इमरान खान यांचं नाव शबाना आझमी यांच्यासोबतही जोडण्यात आलं होतं. तेव्हा हे दोघे आपल्या क्षेत्रातील स्टार होते. मात्र इमरान आणि शबाना आझमी या दोघांनी कधीच याबाबत कोणतीही विधान केलं नाही. पण आजही त्यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *