Shravan 2026: श्रावण महिना..अध्यात्म – निसर्गाचा सुंदर संगम! कधीपासून सुरू होतोय? यंदा श्रावणी सोमवार किती? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती…


Shravan 2026: श्रावण महिना कधी सुरू होणार? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे, कारण हिंदू धर्मात, श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. हा संपूर्ण महिना व्रतवैकल्य, धार्मिक विधी, भगवान शंकराची भक्ती, पूजा आणि उपवासासाठी समर्पित आहे. 2026 वर्षातील श्रावण महिना कधी सुरू होणार? याची उत्सुकता लवकरच संपणार आहे. त्यामुळे जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल की श्रावण कधी सुरू होईल आणि या वर्षी श्रावण महिन्यात किती सोमवार येतील, तर येथे श्रावण महिन्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्या…

श्रावण 2026 कधी सुरू होईल? (Shravan 2026)

धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिना हा भगवान महादेवाचा सर्वात प्रिय महिना म्हणून असल्याचे मानले जाते. हा महिना लवकरच सुरू होणार असल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण लवकरच श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. पावसाळ्याच्या या काळात निसर्गही बहरलेला असतो, त्यामुळे श्रावण हा अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम मानला जातो. वैदिक पंचांगानुसार, 2026 मधील श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी संपेल. भगवान शिवाला समर्पित असलेला हा पवित्र महिना भक्ती, ध्यान आणि उपवासासाठी अत्यंत शुभ मानला जातो. 

यंदा किती श्रावणी सोमवार आहेत? धार्मिक महत्त्व काय? (Shravan Somvar 2026

धार्मिक मान्यतेनुसार, हिंदू धर्मानुसार, श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो, परंतु या महिन्यातील सोमवार विशेषतः भगवान शिवाला समर्पित आहे. भाविकांची अशी धारणा आहे की, या दिवशी उपवास केल्याने आणि शिवलिंगाला जल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणूनच श्रावण महिन्यातील सोमवारच्या उपवासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि मोठ्या संख्येने भक्त या दिवशी उपवास करतात.

2026 च्या श्रावण महिन्यात किती सोमवार येतील?

2026 वर्षात श्रावण महिन्यात एकूण 3 सोमवार असतील. या काळात भाविक या सोमवारी उपवास करू शकतात आणि भगवान शिवाची विशेष प्रार्थना करू शकतात.

पहिला सोमवार: 17 ऑगस्ट
दुसरा सोमवार: 24 ऑगस्ट
तिसरा सोमवार: 31 ऑगस्ट
चौथा सोमवार: 7 सप्टेंबर

श्रावणातील प्रमुख सण

  • श्रावणी सोमवार
  • नागपंचमी
  • पुत्रदा एकादशी
  • रक्षाबंधन
  • नारळी पौर्णिमा
  • श्रावणी पौर्णिमा
  • गोकुळाष्टमी (काही पंचांगांनुसार भाद्रपदात)

हेही वाचा :

Sankashti Chaturthi 2026: 3 की 4 जुलै..संकष्टी चतुर्थी तिथीबाबत संभ्रम? शुभ योगायोग जुळणार, 5 राशींची भरभराट, योग्य तिथी, चंद्रोदय, पूजा पद्धत जाणून घ्या.. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *