Shani Nakshatra Parivartan 2026 : आज शनिचं नक्षत्र परिवर्तन…! शनिच्या संक्रमणाने सर्व 12 राशींवर नेमका कसा होणार परिणाम? वाचा ज्योतिषशास्त्र


Shani Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाला (Shani Dev) कर्मफळदाता तसेच, न्यायदेवता म्हणतात. शनिचं एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारं संक्रमण जितकं महत्त्वाचं असतं तितकंच शनिचं एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात होणारं संक्रमण महत्त्वाचं मानलं जातं. द्रिक पंचांगानुसार, आज म्हणजेच 2 जुलै 2026 रोजी शनि रेवती नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. याचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी शनिचं नक्षत्र परिवर्तन शुभदायी असणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. समाजात तुमचं पद वाढेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. 

मिथुन रास (Gemini Horoscops)

मिथुन राशीसाठी हा काळ मिश्रित फलदायी असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या खर्चावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ शुभदायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात जर काही वाद सुरु असतील तर ते या कालावधीत दूर होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी शनिचं नक्षत्र परिवर्तन करिअरसाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. तसेच, पैशांची गुंतवणूक करु नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी हा काळ फार सकारात्मक ठरणार आहे. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी देखील शनिच्या नक्षत्र परिवर्तनाचा काळ शुभकारक असणार आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्या नवीन नात्याची सुरुवात करु शकता. आरोग्याच्या बाबतीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्यातील निर्णयक्षमता दिसून येईल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या कालावधीत तुमच्या वाणीत गोडवा निर्माण झालेला दिसेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. व्यवसायाचा विस्तार वाढेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी शनिचं संक्रमण लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या धनसंपत्तीत वाढ झालेली दिसेल. तसेच, पैशांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे. या काळात पैशांच्या बाबतीत देखील तुम्ही सावध राहा. तुमचा मानसिक तणाव वाढू शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 2 July 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *