Girija Oak on Father Girish Oak Relationship: ‘आता आम्ही फार संपर्कात नाही, त्यांना त्यांचं कुटुंब, बायको , मुलगी…’, वडील गिरीश ओकांबद्दल गिरीजा ओक स्पष्टच म्हणाली…


Girija Oak on Father Girish Oak Relationship: मराठी मनोरंजनसृष्टीतील कसदार आणि सशक्त अभिनेत्री गिरिजा ओक (Girija Oak) गेल्या काही महिन्यांपासून ‘नॅशनल क्रश’ म्हणून देशभरात ओळखली जाऊ लागली. अभिनेते गिरीश ओक( Girish Oak) यांची मुलगी म्हणूनही गिरीजाला आजही  ओळखतात. अलीकडेच ‘राजश्री मराठी’ ला दिलेल्या मुलाखतीत तिचं आणि वडील गिरीश ओक यांचं नातं कसं आहे, यावर गिरिजा भरभरून बोलली आहे. अभिनेते गिरीश ओक यांच्या पहिल्या पत्नी आणि गिरिजाच्या आईचं नाव पद्मश्री फाटक. लग्नानंतर काही वर्षांनी अभिनेते गिरीश ओक आणि पद्मश्री यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2008मध्ये गिरीश ओक यांनी दुसरं लग्न केलं.गिरिजा त्यानंतर आपल्या आईबरोबर राहू लागली.  नंतर बाबांची तसा फार संपर्क आला नाही. त्यांचंही वेगळं कुटुंब आहे. त्यांची बायको आहे मुलगी आहे ..सगळं उत्तम आहे . असंही गिरिजा म्हणाली.

गिरिजा ओक काय म्हणाली?

‘मी लहान असताना, मी माझ्या बाबांची सगळ्यात मोठी फॅन होते.मी त्यांची जवळपास सगळी नाटकं पाठ होईपर्यंत पाहिली आहेत.प्रत्येक नाटकाचे मी 20 20 प्रयोग वगैरे पाहिले असतील.कुसुम मनोहर लेले,ज्याचा त्याचा प्रश्न, देहभान, अगदी नंतर नंतरच्या नाटकांपर्यंतसुद्धा मी सगळी नाटकं पाहिली आहेत त्यांची. त्यातच मोठी झाली आहे. डॉक्टर तुम्ही सुद्धा हे खूप कमाल नाटक होतं. तुम्ही नव्हेच हे पाहिलंय. कुसुम मनोहर लेले मधील तर मला सगळे डायलॉग पाठवते. इतकं मला ते नाटक आवडायचं. त्याच्यामध्ये त्यांनी खलनायकाचा रोल केला की मला नाही आवडायचं. नायकाचा रोल केला की ते आवडायचं.मी त्यांना प्रत्येक प्रयोगाच्या आधी नेहमी विचारायचे ‘आज कुठला रोल?’ तर मग ते सांगायचे की हिरोचा रोल..मग मला मजा यायची. बाबांचं काम बघतच मी मोठी झाली आहे. 

आता आम्ही फार संपर्कात नाही ..

ती पुढे म्हणाली ‘कालांतराने माझे आई-वडील वेगळे झाले.आणि मी माझ्या आईबरोबर राहू लागले.त्यानंतर बाबांशी फारसा संपर्क आला नाही.पण अजूनही एक कलाकार म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलं आहे, ते अत्यंत स्वकष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर केलं आहे. त्याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे, आदर आहे. पण तसे आम्ही फार संपर्कात नाही आहोत. करण एका काळानंतर मी माझ्या आईकडे राहायला लागले. आता त्यांचा पण एक परिवार आहे.त्यांची बायको आहे, मुलगी आहे. उत्तम आहे सगळं. सगळ्यांचे एकत्र येणं झालं तर, आम्ही भेटतो. तेव्हा एकमेकांसमोर येतो. रोजचं बोलणं – भेटणं आता तसं फारसं उरलं नाही. मला माझं आयुष्य आहे. त्यांना त्यांचा आयुष्य आहे. 

‘लग्नानंतर मी पण माझ्या आयुष्यात बिझी झाले. कलाकार म्हणून मला अजूनही असं वाटतं की ते त्यांच्यात अजून खूप आहे ते स्क्रीन- टेलिव्हिजनला खूप काही देऊ शकतात आणि ते देतातही. ज्या प्रकारची नाटकं ते आत्ता करतात, विषय निवडतात ते कमाल असतात. मला अजूनही खूप लोक येऊन विचारतात की, तुम्ही गिरीश ओकांची मुलगी ना .. तेव्हा मला खूप छान वाटतं, हे ऐकून.मला अजूनही त्यांची मुलगी म्हणून ओळखलं जातं. नंतर ते असेही म्हणतात की, वडिलांसारखाच आम्हाला तुमचेही खूप कौतुक आहे. त्यामुळे मग मला अजून भारी वाटतं. मी चांगलं काम केलं तर ते थोडसं ते त्यांच्याकडून आलेलं आहे.  पण मी वाईट काम केलं तर लोकांनी त्यांचं नाव घेऊ नये, असे एक दडपण असतं मला. त्यांची मुलगी म्हणून मी असं काही नको करायला की, एवढ्या चांगलं नटाची मुलगी असं काय करते. असं नको व्हायला. त्याचं थोडंसं जाणीव ठेवूनच मी काम करते.’असं गिरिजा ओक म्हणाली.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *