IND A vs SL A : तीन खेळाडू OUT, तीन नवे चेहरे IN…; श्रीलंकेला चकित करण्यासाठी ध्रुव जुरेलचा मास्टरप्लॅन, भारतीय अ संघाच्या Playing XI मध्ये मोठे बदल


Sri Lanka A vs India A 2nd Unofficial Test : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला गुरुवारी सुरुवात झाली. या सामन्यात भारत अ संघाचा कर्णधार ध्रुव जुरेल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर आता मालिका जिंकण्यासाठी भारतासमोर ही सुवर्णसंधी आहे.

भारत अ संघात तीन महत्त्वाचे बदल

दुसऱ्या कसोटीसाठी भारत अ संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. पहिल्या सामन्यात खेळलेले सलामीवीर आयुष पांडे, अष्टपैलू हर्ष दुबे आणि वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अमन मोखाडे, गुरनूर बराड आणि जीशान अन्सारी यांना अंतिम अकरामध्ये संधी देण्यात आली आहे.

साई सुदर्शन-अमन मोखाडे सलामीला

भारताच्या डावाची सुरुवात साई सुदर्शन आणि अमन मोखाडे ही जोडी करणार आहे. मधल्या फळीत अनुभवी आणि दमदार फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. फलंदाजीची जबाबदारी देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, कर्णधार ध्रुव जुरेल आणि शेख रशीद यांच्यावर असेल. अष्टपैलू म्हणून सारांश जैन संघात कायम ठेवण्यात आला आहे. गोलंदाजी विभागात जीशान अन्सारी, आकिब नबी दार, यश ठाकूर आणि गुरनूर बराड यांच्यावर श्रीलंकेला रोखण्याची जबाबदारी असेल.

पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णित

भारत अ संघाने पहिल्या अनधिकृत कसोटीत उत्कृष्ट खेळ केला होता. ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखालील संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. भारताने श्रीलंका ‘अ’ संघासमोर विजयासाठी आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. मात्र, अखेरच्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे खेळ होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे आता दुसरी कसोटी जिंकून मालिका 1-0 ने आपल्या नावावर करण्याची भारताकडे उत्तम संधी आहे.

भारत अ संघाची प्लेइंग इलेव्हन – साई सुदर्शन, अमन मोखाडे, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शेख रशीद, सारांश जैन, जीशान अन्सारी, आकिब नबी दार, यश ठाकूर, गुरनूर बराड

श्रीलंका ‘अ’ संघाची प्लेइंग इलेव्हन – पावंथा वीरसिंघे, सोहन डी लिवेरा, नुवानीदू फर्नांडो, एशेन बंडारा, सहान अराचिगे (कर्णधार), अंजला बंडारा (यष्टीरक्षक), चमिका गुनासेकरा, दिलम सुदीरा, केशरा नुवांथा, दुलज समुदिथा, असंका मनोज

हे ही वाचा –

Hardik Pandya Trade IPL 2027 : हार्दिकच्या ट्रेडमध्ये खतरनाक ट्विस्ट; MI अन् CSK दोन्ही फ्रेंचायजींनी अखेर सांगितली आतली गोष्ट, नक्की कोणत्या संघांत जाणार पांड्या?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *