Pune News: पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील ‘ती’ चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?


Pune PSI Viral Video :  पुणे शहरातील एका कॅफेमध्ये घुसून ग्राहक आणि  कॅफेतील कर्मचाऱ्यांशी बेजबाबदार वर्तन करणे, तसेच तोडफोड करणे पुणे पोलीस दलातील एका उपनिरीक्षकाला भोवलं आहे. या गैरवर्तनाचा सीसीटीव्ही व्हिडिओ (Pune PSI Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.(Pune PSI Viral Video)

 पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांना एका कॅफेमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तन व तोडफोड केल्याच्या आरोपावरून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जूनच्या रात्री पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम हे नाईट ड्युटीवर (रात्रीच्या गस्तीवर) तैनात होते. रात्री साधारण पावणेदोन (१:४५) वाजेच्या सुमारास ते शिरोळे रस्ता येथील एका कॅफेमध्ये पोहोचले. त्यावेळी कॅफे बंद करण्याची तयारी सुरू होती.(Pune PSI Viral Video)

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, पीएसआय संदीप कदम हातात काठी घेऊन कॅफेमध्ये प्रवेश करतात. त्यांनी काउंटरपाशी जात थेट तिथे ठेवलेले कॉफीचे ग्लास आणि इतर खाद्यपदार्थांवर काठी मारून ते खाली पाडले आणि सामानाचे नुकसान केले. यानंतर त्यांनी तिथे बसलेल्या ग्राहकांना तात्काळ उठून बाहेर जाण्यासाठी सांगितले, तसेच कॅफेच्या कर्मचाऱ्यांनाही अत्यंत अभद्र आणि उद्धट भाषा वापरून दमदाटी केली. पोलिसाच्या या अचानक झालेल्या अवतारामुळे कॅफेमधील ग्राहक आणि कर्मचारी प्रचंड घाबरले होते.

Pune PSI Viral Video :  अप्पर पोलीस आयुक्तांकडून निलंबनाचे आदेश

हा सर्व प्रकार कॅफेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. संदीप कदम यांचे हे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचे, पोलीस दलाच्या शिस्तीला काळिमा फासणारे आणि विभागाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी पीएसआय संदीप कदम यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. 

Pune PSI Viral Video :  नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार,6 जून रोजी पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम हे नाईट ड्युटीवर असताना त्यांनी पुणे शहरातील शिरोळे रोडवरील एका कॅफेमध्ये प्रवेश केला.कॅफेमध्ये गेल्यानंतर त्यांनी तेथील कर्मचारी आणि उपस्थित ग्राहकांशी अत्यंत अरेरावीची भाषा वापरली आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. एवढ्यावरच न थांबता,कदम यांनी  हातातील शासकीय काठीने कॅफेच्या काउंटरवरील कॉफीचे ग्लास आणि इतर खाद्यपदार्थ खाली पाडले. तसेच कॅफेमध्ये बसलेल्या ग्राहकांना तात्काळ उठून बाहेर जाण्यास धमकावले. हा संतापजनक प्रकार कॅफेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

 

हेदेखील वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *