Shiv Sena UBT: ठाकरे गटात मोठी फूट! खासदारांचे बंड, संसदीय दलाच्या बैठकीसाठी किती खासदार उपस्थित? समोर आला शॉकिंग आकडा | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Shiv Sena UBT rebel MP : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाच्या खासदारांनी बंडखोरीचे पाऊल उचलल्याच्या चर्चांनंतर व्हीप बजावून आज बैठक घेण्यात आली.

ठाकरे गटात मोठी फूट!  ६ खासदारांचे बंड, संसदीय दलाच्या बैठकीसाठी किती खासदार उपस्थित? समोर आला शॉकिंग आकडा
ठाकरे गटात मोठी फूट! ६ खासदारांचे बंड, संसदीय दलाच्या बैठकीसाठी किती खासदार उपस्थित? समोर आला शॉकिंग आकडा

नवी दिल्ली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाच्या खासदारांनी बंडखोरीचे पाऊल उचलल्याच्या चर्चांनंतर आता ठाकरे गटाकडून वेगाने ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पक्षातील फूट रोखण्यासाठी आणि नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तातडीने ‘व्हिप’ (पक्षादेश) जारी केला होता. आज शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती.

ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी आपल्या सर्व खासदारांना व्हीप बजावून तातडीची बैठक बोलावली आहे. या महत्त्वाच्या बैठकीला कोणते खासदार उपस्थित राहतात आणि कोण गैरहजर राहते, यावरूनच पक्षात नेमकी किती खासदारांनी बंडखोरी केली आहे आणि कोणाचा पाठिंबा कोणाला आहे, याचे चित्र स्पष्ट होणार होतं. त्यामुळे या बैठकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.  आज सकाळी ११ वाजता ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिला होता.

>> ठाकरे गटाच्या बैठकीला लोकसभेचे कोणते खासदार उपस्थित?

> अरविंद सावंत

> अनिल देसाई

> राजाभाऊ वाझे

>  संजय राऊत  (राज्यसभा)

बैठकीत चर्चा काय?

खासदारांनी बोलावलेल्या बैठकीत गैरहजर राहणाऱ्या खासदारांबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. व्हीप बजावून देखील अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने ही चर्चा झाल्याची माहिती आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांना थेट कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

ठाकरे गट आक्रमक…

दरम्यान, खासदारांच्या बैठकीआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी फुटीर खासदारांना थेट कारवाईचा इशारा दिला. बैठकीला उपस्थित न राहिल्यात तत्काळ अॅक्शन घेतली जाईल, असं राऊतांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Shiv Sena UBT: ठाकरे गटात मोठी फूट! खासदारांचे बंड, संसदीय दलाच्या बैठकीसाठी किती खासदार उपस्थित? समोर आला शॉकिंग आकडा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *