Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?


Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: मी कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड कष्ट केलं, 2022 साली देखील मी सगळ्यांना एकट्याने अंगावर घेतलं. नंतर एकेक करत पक्षात आले, पण सुरुवातीला राजेश क्षीरसागर निधड्या छातीने लढला, साहेबांना मी दोष देत नाही, त्यांच्या देखील काही अडचणी असतील,पण अडचण एकदा ठीक आहे, साहेबांनी अडीच वर्षांनी मंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं आहे. अडीच वर्षानंतर मात्र मला निश्चित मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. 

2024 च्या निवडणुकीनंतर मला मंत्रिपदाची अपेक्षा होती

राजेश क्षीरसागर म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीनंतर मला मंत्रिपदाची अपेक्षा होती. 2014 साली देखील सगळ्यांनी मिळून आम्हाला बाजूला केलं.पक्षासाठी कडवट होऊन काम करायचं नाही का? सगळ्यांनी घेरून आम्हाला बाजूला करायचं आणि वरिष्ठांनी त्याची दखल घ्यायची कितपत योग्य आहे अशी विचारणा राजेश क्षीरसागर यांनी केली. ते म्हणाले की, अजितदादा पवार एकदा म्हणाले होते, लाट्या काठ्या खाणाऱ्या राजेश क्षीरसागरना मंत्रीपद मिळेल. विरोधकांना कळतं, सर्वांना कळतं, मी देवाकडे प्रार्थना करतो आता माझ्या नेत्याला पण कळू दे, असेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, अशावेळी मला वाटतं मी कुठे कमी आहे का माझं मेरीट नाही का? खूप वाईट वाटतं. मी मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहे. नवीन आलेला कुणीही उठतो आणि पदं मागतो, महामंडळ मागतो, पण जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी आग्रही आहे.  2022 साली एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्याला सगळ्यात आधी कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. 

महाडिक- बिडीक सोडून द्या 

राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले की,  मी 24 तासांपैकी 18 तास काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यालयात कोण व्यापारी भेटणार नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर भेटणार नाही. इथं येणारी माणसं सर्वसामान्य आहेत. मी, सतेज पाटील, महाडिक कॉलेज पासून एकमेकांचे मित्र आहोत. सतेज पाटील यांना महादेवराव महाडिक यांचा देखील पाठिंबा मिळाला होता. महाडिक- बिडीक सोडून द्या सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेमुळे सतेज पाटील पहिल्यांदा आमदार झाल्याचेही क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे बोट धरून सतेज पाटील विधिमंडळात आले त्यावेळी सगळी शिवसेना घेऊन ते गेले. 2019 साली माझ्या विरोधात जातीवादी विष पेरण्यात आले.महाडिक यांनी देखील सतेज पाटील यांना मदत केली सतेज पाटील यांनी देखील त्यांना मदत केली आहे. सतेज पाटील यांचा महानगरपालिकेतील महापौर आमच्या नगरसेवकांमुळे होता, असेही क्षीरसागर यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *