
भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 329 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्ये 85.30 अंकांची घसरण झाली. यामुळं गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले आहेत.

सेन्सेक्स 329 अंकांनी घसरुन 74529.08 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 85.30 अंकांनी घसरुन 23329.00 अंकांवर बंद झाला आहे.

शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचे 2.37 लाख कोटी रुपयांचं नुकसान एकाच दिवसात झालं. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 482 लाख कोटींवरुन कमी होऊन 480 लाख कोटींवर आलं आहे.

सेन्सेक्सवरील टॉप 30 शेअरपैकी फक्त 7 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 23 शेअरमध्ये घसरण झाली. इटर्नल, इंडिगो, टायटनच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली तर बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट आणि बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

बीएसईवर लिस्ट असलेल्या 4581 स्टॉकमध्ये आज ट्रेडिंग झालं, यापैकी 2174 शेअर तेजीसह बंद झाले. तर 2189 शेअरमध्ये घसरण झाली. तर, 218 शेअरमध्ये कोणतीही तेजी किंवा घसरण झाली नाही. तर, 177 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला तर 99 स्टॉकनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 22 Sep 2026 10:51 PM (IST)