जमुई अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट, मुख्य आरोपीसहित दोघांचा एन्काउंटर, ‘योगी पॅटर्न’ची चर्चा – Marathi News | Bihar jumai minor assault case police encounter two accused after trying to running


बिहारच्या जमुईमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीसहित दोन आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला, त्यानंतर दोघांच्या मुसक्या आवळण्यास यश आलं. पोलिसांनी आरोपी नंदन यादव आणि हरेराम यादव यांच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांना पाहून दोघेही जण पळ काढत होते. त्याचवेळी पोलिसांनी दोघांच्या पायावर गोळ्या झाडल्या. याआधी तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

पोलिसांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये दोघांचा वयोगट हा 17 ते 18 वर्षांदरम्यानचा आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सात ते आठ जणांची ओळख पटवली आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर तपासली जात आहे. पोलिसांकडून व्हिडिओचा तपास आणखी वेगळ्या अँगलने केला जात आहे. तर दुसऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर देखील पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. यात फेसबुक , इन्स्टाग्राम, एक्स अकाउंटचा समावेश आहे. सोशल मीडियावर पीडित अल्पवयीन मुलीची ओळख उघड करणे गुन्हा मानला जातो, त्यानुसारही पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या आरोपींवर पोस्को अॅक्ट आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे .व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेवरून कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सर्व आरोपींवर पोस्को अंतर्गत कारवाईची मागणी केली. त्यांनी आरोपींवर उशिराने कारवाईवरून सवाल उपस्थित केले. त्यांनी बिहारमधील महिला सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसने कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवरून बिहार सरकारवर निशाणा साधला. काँग्रेस प्रवक्ते शमा मोहम्मद यांनी बिहारमध्ये ‘जंगल राज’ असल्याचे म्हणत टीका केली.

काय आहे प्रकरण?

जुमईत दहावीचे एका विद्यार्थिनी आणि विद्यार्थी सांयकाळी कोचिंग क्लासनंतर मडवा डोंगरावर फिरायला गेले. दुचाकी चालवताना मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असताना डोंगराळ भागात दोघांना एका घोळक्याने अडवलं. या ग्रुपने दोघांसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांना दुचाकीवरून उतरवरून मारहाण करण्यास सुरुवात केली. या ग्रुपने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मुलीसोबत अत्यंत वाईट पद्धतीने वर्तवणूक केली. आरोपींनीच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *