सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त


मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईचा धसका सर्वांनीच घेतला आहे. त्यामुळेच, गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवरही विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी सार्वजनिक ठिकाणचा भंडारा आणि मिठाई व हॉटेल व्यवसायिकांना इशारा दिला होता. मात्र, तरीही गणेशोत्सव आणि गौराईच्या आगमन सणाच्या काळात अनियमितता आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत तब्बल 30 परवाने निलंबित केले आहेत. तर, तब्बल 50 टन साठा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारातील एकूण किंमत 1 कोटी 19 लाख रुपये असल्याची माहिती आहे.  

राज्यभरात सणासुदीच्या निमित्ताने अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत विविध जिल्ह्यांत मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, तांदूळ, ड्रायफ्रूट्स, नमकीन, फरसाण, चहा, मसाले, सॉस, नूडल्स, वेफर्स व इतर अन्नपदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. या धाडीत एकूण ५०,६०१.७८ किलो (सुमारे ५०.६० टन) साठा जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत 1 कोटी 19 लाख रुपये आहे. यासह, महाराष्ट्रातील एकूण 30 अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यामध्ये, मुंबईतील – 13, कोकण विभागातील 6 आणि पुणे विभागातील 8, तर संभाजीनगर विभागातील 3 नामांकित अन्न आस्थापनांचे (हॉटेल / रेस्टॉरंट इ. चे) परवाने निलंबन करण्यात आले आहेत. 

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईत 26 आस्थापनांची तपासणी करुन 30.93 लाखांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला असून 22 एफ.आय.आरसह  30 व्यक्तींना अटकही करण्यात आली. यासह 3 आस्थापने सील व 3 वाहने जप्त करण्यात आले आहेत. राज्यातील हॉटेल / रेस्टॉरंट / धाबा / क्लब / बेकरी इ. आस्थापनांवर ही कारवाई करत परवाने निलंबन करण्यात आले आहेत. त्यामध्ये, सर्वाधिक मुंबईतील 13 आस्थापनांचे परवाने/नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहेत. 

काळबादेवी येथेही FDI चा छापा

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली “सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र” धोरणांतर्गत मे. कयानी अँड कंपनी, काळबादेवी, मुंबई येथे दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी: अन्न तयार करणे व साठवणूक क्षेत्रात मांजर, उंदरांची विष्ठा, जिवंत माझ्या व मृत झुरळे, रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले व प्रक्रिया विभागात उघडे सांडपाणी मॅनहोल आढळून आले. तसेच अन्नपदार्थ जमिनीवर ठेवणे, कच्चे पीठ छापील वर्तमानपत्राने झाकणे, कर्मचाऱ्यांकडून आवश्यक स्वच्छता व PPE चा वापर न करणे आणि कच्चे व तयार अन्नपदार्थाचे अयोग्य विभाजन अशा गंभीर त्रुटी आढळल्या. 

लोअर परेलमध्ये कारवाई

विभागाने लोअर परेल येथील मे. एव्हरसब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (सबवे) या आस्थापनेचा अन्न परवाना (क्र. ११५२४००४०००१८१) तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. ही आस्थापना युनिट क्र. F-२५A, पहिला मजला, ब्लॉक क्र. ०२, फिनिक्स मिल्स कंपाऊंड, ४६२, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ येथे आहे. एआय पोर्टलवर प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुचिका संजय सुर्यवंशी यांनी २६ सप्टेंबर रोजी या आस्थापनेची तपासणी केली. तपासणीत अनुसूची ४ मधील स्वच्छता व आरोग्यविषयक निकषांचे गंभीर उल्लंघन आढळून आले.

हेही वाचा

मोठी बातमी! महाराष्ट्राचा ‘दुष्काळ’ दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *