नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने टी-20 क्रिकेट मध्ये 200 सामन्यात विजय मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अशी कामगिरी करणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताने जपानवर 2 धावांची विजय मिळवत या विक्रमाची नोंद केली. यामध्ये सुपर ओव्हर मधील विजयाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे भारताने पहिला टी 20 सामना जिंकला होता. टीम इंडियाने 50 वा ,100 वा, 150 वा, 200 वा सामना जिंकत नवा इतिहास घडवला आहे.
भारताने जपानवर 2 धावांची विजय मिळवत या विक्रमाची नोंद केली
भारताने आपला पहिला टी 20 सामना 1 डिसेंबर 2006 ला दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळला होता. या सामन्यात भारताने 6 विकेटने विजय मिळवला होता. यानंतर भारताने 2017 मध्ये 50 वा विजय श्रीलंकेवर मिळवला होता. भारताने कोलंबो येथे झालेल्या सामन्यात 7 विकेटने विजय मिळवला होता. यानंतर भारताने 100 वा टी 20 सामन्यातील विजय 2022 मध्ये वेस्ट इंडिज विरोधात कोलकाता येथे 8 धावांनी मिळवला होता. यानंतर 150 वा विजय 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात 24 धावांनी मिळवला होता. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जपानवर 2 धावांनी 200 व्या विजयाची नोंद केली. भारताचे टी 20 क्रिकेटमध्ये विजयाचे द्विशतक पूर्ण झाले आहे. असा कामगिरी करणारा भारत पहिलाच देश आहे.
भारताचा जपानवर 2 धावांनी विजय
भारत आणि जपान यांच्यातील पहिल्याच सामन्यात पावसानं व्यत्यय आणला. यामुळं सामना 5-5 ओव्हरचा खेळवण्यात आला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 32 धावा केल्या, जपनाच्या गोलंदाजांचे बॉल अपेक्षेपेक्षा जास्त वळत होते. भारतीय गोलंदाजांनी संघाला पराभवापासून वाचवलं. जपाननं 5 ओव्हरमध्ये 3 बाद 30 धावा केल्या. श्रेयस अय्यरनं म्हटलं बॉल वळत असल्यानं फलंदाजी करणं अवघड होतं.
या विजयानंतर टीम इंडियाला लगेचच गुड न्यूज, आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये भारताला पहिलं स्थान
टीम इंडियानं जपानला 2 धावांनी पराभूत करत रोमांचक विजय मिळवला. भारत आणि जपान यांच्यातील हा पहिला टी 20 सामना होता. नवख्या जपाननं भारताला विजयासाठी झुंजवलं. जो सानो क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात भारतानं अटीतटीच्या सामन्यात 2 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाला लगेचच गुड न्यूज मिळाली. भारतानं आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये पहिलं स्थान पुन्हा मिळवलं आहे. भारतानं इंग्लंडकडून पहिलं स्थान मिळवलं. आता इंग्लंड दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दोन्ही संघांकडे 269 गुण आहेत. इंग्लंडनं काही दिवसांपूर्वी टी 20 मालिकेत श्रीलंकेला पराभूत करत भारताकडून पहिलं स्थान पटकावलं होतं. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतानं ते पुन्हा मिळवंल आहे. ।