Shani Dosh: कर्ज…खर्च..अपयश..’शनिदोष’ – एक सत्त्वपरीक्षा! 2026 – 2032 पर्यंत ‘या’ राशींवर प्रभाव! का लागतो हा दोष? काय काळजी घ्याल?


Shani Dosh: शनिदेव…शनिच्या नावाचा केवळ उल्लेख केल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण होते. कारण ज्याच्या आयुष्यात शनि येतो, त्यांचे जीवन समस्यांना भरून जाते अशी लोकांची मान्यता आहे, ज्यामुळे अनेक लोक चिंताग्रस्त होतात, अनेकदा जेव्हा आयुष्यात अचानक समस्या येतात, तेव्हा आपले जीवन शनिच्या प्रभावाखाली आहे की काय, असा विचार करू लागतात. आज शनिदेवांच्या शनिदोषाबद्दल जाणून घेणार आहोत, नेमका काय आहे हा शनिदोष? कधी आणि का लागतो? सध्या कोणत्या राशी याच्या प्रभावाखाली आहेत? जाणून घेऊयात…

शनिदोष म्हणजे काय? (Shani Dosh)

शास्त्रांमध्ये शनिला न्याय आणि कर्माचा देव मानले जाते. ते व्यक्तींना त्यांच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळे देतात. पण शनि नेहमीच वाईट परिणाम देतात ही कल्पना चुकीची आहे. ज्यांच्या कुंडलीत शनिची स्थिती चांगली असते, ते एखाद्या व्यक्तीला दरिद्रीतून राजा बनवू शकतात. कारण शनिदेव व्यक्तींना त्यांच्या चांगल्या कर्मांसाठी शुभ फळे देखील देतात. परंतु ज्यांच्या कुंडलीत शनि अशुभ स्थितीत असतो, त्यांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कमजोर शनि किंवा शनिदोषाची लक्षणं जाणून घेऊया.

शनिदोष का लागतो? 

ज्योतिषशास्त्रात शनि हा कर्मफळाचा ग्रह मानला जातो. त्यामुळे व्यक्तीच्या मेहनत, वर्तन, जबाबदारी आणि निर्णयांची परीक्षा शनि घेतो असे मानले जाते. 

मुख्य कारणे अशी मानली जातात…

  • जन्मकुंडलीत शनि अशुभ भावात किंवा नीच राशीत असणे
  • शनि आणि इतर पापग्रहांचा अशुभ योग तयार होणे
  • शनिची साडेसाती किंवा ढैय्या सुरू असणे
  • शनि महादशा किंवा अंतर्दशा प्रतिकूल असणे
  • कर्म, जबाबदाऱ्या किंवा जीवनातील शिस्त यांची परीक्षा घेणारा काळ येणे

शनिदोष कधी लागतो?

  • ज्योतिषशास्त्रानुसार, जीवनातील वाईट कर्मांमुळे शनिदेवांची वक्रदृष्टी पडते आणि शनिदोष होतो.
  • याव्यतिरिक्त, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी गैरवर्तन केल्यानेही शनिदोष होतो.
  • गरिबांचे शोषण तसेच त्यांचे पैसे न दिल्यास शनिदोष लागतो.
  • शनिदेवांची पूजा करताना जाणूनबुजून केलेल्या चुकीमुळे देखील शनिदोष होऊ शकतो.

शनिदोष सध्या या राशींवर…

मकर – साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असून तो अंदाजे २०२७ च्या सुरुवातीपर्यंत कमी होत जाईल. त्यानंतर दिलासा मिळू शकतो.
कुंभ – साडेसातीचा मुख्य प्रभाव सध्या सुरू आहे. हा प्रभाव साधारण २०२८ पर्यंत राहू शकतो.
मीन – साडेसातीची सुरुवात झाली असून तिचा प्रभाव पुढील काही वर्षे म्हणजे अंदाजे २०३३ पर्यंत टप्प्याटप्प्याने राहू शकतो.

शनि ढैय्या कधीपर्यंत…

मेष – ढैय्याचा प्रभाव अंदाजे 2027 पर्यंत राहू शकतो.
वृश्चिक – ढैय्याचा प्रभावही साधारण 2027 पर्यंत जाणवू शकतो.

शनिदोषाची लक्षणे..

  • चालू कामात अडथळे येणे.
  • कर्जाच्या समस्या वाढणे.
  • संपत्ती हळूहळू खर्च होणे.
  • एखाद्या व्यक्तीशी वाद होणे.
  • कठोर परिश्रम करूनही यश न मिळणे.

शनिदोषावरील उपाय

  • ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदोष दूर करण्यासाठी शनिवार शुभ मानला जातो. 
  • या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला सात प्रदक्षिणा घाला. 
  • त्यानंतर, पूर्ण मनाने शनिदेवांची स्तुती आणि चालिसा म्हणा. 
  • असे मानले जाते की या उपायाने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदोष दूर होतो.
  • तसेच, कुंडलीतील शनिदोष दूर करण्यासाठी शनिवारी शनिदेवांना मोहरीचे तेल अर्पण करा. 
  • हे उपाय केल्याने व्यक्तीला शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो आणि शनिदोषाची समस्या दूर होते. 

शनिदेवासाठी मंत्र

ॐ शं शनैश्चराय नमः।

ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः।
ॐ नीलाजंन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्।
छाया मार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्।।

ॐ शन्नो देवीरभिष्टडआपो भवन्तुपीतये।

ॐ भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्।

हेही वाचा

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाच्या ‘त्या’ भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या! पुढच्या 6 दिवसांत 5 राशींना मोठा जॅकपॉट? ‘हा’ दिवस टर्निंग पॉईंट? तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *