नमाज, हिजाब अन् ट्रेनिंग… निदा खान प्रकरणात मोठा ट्विस्ट, कोठडीआधी कोर्टात नेमकं काय घडलं? – Marathi News | Nida khan case big twist before police custody what happened in court


नाशिकमधील कथित धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक करण्यात आल्यानंतर आज तिला कोर्टात हजर करण्यात आले आहे. त्यानंतर आता तिला 11 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या काळात तिची सखोल चौकशी होणार आहे. पोलिस कोठडी सुनावण्यापूर्वी कोर्टात नेमकं काय घडलं याची माहिती समोर आली आहे. सरकारी वकील आणि निदा खानचे वकील यांनी याबाबत नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

11 तारखेपर्यंत पोलिस कोठडी

निदा खान प्रकरणातील सरकारी वकील अजय मिसर यांनी म्हटले की, निदान खान यांचा अटकपूर्व जमीन अर्ज 2 मे रोजी रद्द केला होता. त्यानंतर आरोपी फरार होती. नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी एकत्रित कारवाई करत तिला अटक केली आहे. महिला असल्याने आणि सूर्यास्तानंतर अटक झाल्याने तिला न्यायालयाची परवानगी घेऊन नाशिकला आणण्यात आलं. आम्ही 7 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती, आता तिला 11 तारखेपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे.

नमाज, हिजाब अन् ट्रेनिंग

पुढे बोलताना वकील अजय मिसर यांनी सांगितले की, या प्रकरणातील पीडितेला धर्मांतराच्या उद्देशाने धाक दाखवण्यात आला होता. तिला बुरखा देण्यात आला, नमाज, हिजाब याबाबत ट्रेनिंग देण्यात आले. यात निदाचा काय रोल आहे? इतर कोणी सहभागी आहे का याचा तपास करायचा आहे. पीडितेच्या मोबाईलमध्ये चिथावणीकारक काही रिल टाकण्यात आले होते. याचा सखोल तपास आवश्यक आहे. पीडितेच्या घरी जाऊन आरोपीने नमाज, बुरखा याबाबत कारवाई केली आहे. त्याचा तपास करायचा आहे.

आरोपी गरोदर असल्याने…

अजय मिसर पुढे बोलताना म्हटले की, पीडितेच नाव नाव हनिया ठेवण्यात आलं होत. या नावाबद्दल काही डॉक्युमेंट्स सापडले आहेत. मालेगावमध्ये काही लिंक्स आढळून आले आहेत. तपासात संभाजीनगरमध्ये महिलेला कोणी आश्रय दिला याच्या तपासात मतीन पटेल हे नाव पुढे आले आहे, त्याचा तपास करायचा आहे. या अनुषंगाने तिला 11 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी गरोदर असल्याने तिच्या आईला भेटण्याची परवानगी मागितली आहे. त्यास आम्ही हरकत घेतलेली नाही. दिवसातून 2 वेळेस आईला भेटण्याची परवानगी दिलेली आहे.

निदा खानचे वकील काय म्हणाले?

निदा खान यांचे वकील राहुल कासलीवाल यांनी म्हटले की, 7 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. सोमवारपर्यंत द्यायला हरकत नाही आम्ही म्हणालो. बुरखा कुठून आणला हे ग्राउंड कसे असू शकते. मोबाईलवर काही डाउनलोड केले हे निराधार आहे. मोबाईल लिंक्स कुठेही मिळू शकतात. निदा हिला औषधोपचार साठी आम्ही विनंती केली होती, ती मान्य केली आहे. तसेच आईला दिवसातून दोन वेळेस भेटण्याची परवानगी दिलेली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *