विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
