ENG vs NZ : स्टोक्सला क्रिकेटचा शेवटचा दिवसही जखम देऊन गेला… घरच्या मैदानातच इंग्लंडच्या माथी ‘कलंक’! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

इंग्लंडचा महान ऑलराऊंडर बेन स्टोक्सचं इंटरनॅशनल करिअर पराभवासोबतच संपलं आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 160 रननी पराभव केला.

स्टोक्सला क्रिकेटचा शेवटचा दिवसही जखम देऊन गेला... घरच्या मैदानातच इंग्लंडच्या माथी 'कलंक'!
स्टोक्सला क्रिकेटचा शेवटचा दिवसही जखम देऊन गेला… घरच्या मैदानातच इंग्लंडच्या माथी ‘कलंक’!

मुंबई : इंग्लंडचा महान ऑलराऊंडर बेन स्टोक्सचं इंटरनॅशनल करिअर पराभवासोबतच संपलं आहे. नॉटिंघमच्या ट्रेन्ट ब्रीजमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 160 रननी पराभव केला आणि सीरिज 2-1 ने जिंकली. न्यूझीलंडने याआधी इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच जमिनीवर 1986, 1999 आणि 2021 सालीही टेस्ट सीरिज जिंकली होती, पण 2021 ची सीरिज फक्त 2 मॅचची होती.

ट्रेन्ट ब्रीज टेस्टच्या चौथ्या दिवशी बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे इंग्लंडची टीम त्यांच्या कर्णधाराला विजयाचं गिफ्ट देईल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती, पण न्यूझीलंडने उत्कृष्ट कामगिरी करून इंग्लंडच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं.

इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी 373 रनचं आव्हान मिळालं होतं. पाचव्या दिवसाची सुरूवात इंग्लंडने 103/4 अशी केली होती. यानंतर न्यूझीलंडच्या बॉलरनी दबाव बनवून ठेवला. पाचव्या दिवसाच्या लंचनंतर इंग्लंडचा 212 रनवर ऑलआऊट झाला आणि न्यूझीलंडने हा सामना जिंकला.

35 वर्षांच्या बेन स्टोक्सने जवळपास 15 वर्ष इंग्लंडचं प्रतिनिधीत्व केलं आणि मागची 4 वर्ष टेस्ट टीमची कॅप्टन्सी सांभाळली. स्टोक्स दुसऱ्या इनिंगमध्ये ओपनिंगला बॅटिंगसाठी आला पण 30 रन करून आऊट झाला. आपल्या कर्णधाराच्या करिअरचा शेवट गोड करण्यात इंग्लंडच्या टीमला अपयश आलं.

या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये 438 रन केले, यानंतर इंग्लंडचा पहिल्या इनिंगमध्ये 354 रनवर ऑलआऊट झाला. तर दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने 288/9 वर डाव घोषित केला, त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 373 रनचं आव्हान मिळालं.

इंग्लंडची लाजिरवाणी कामगिरी

हा पराभव इंग्लंड क्रिकेटची चिंता वाढवणारा आहे. 2012 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडची टीम घरच्या मैदानात 3 किंवा त्यापेक्षा जास्त टेस्ट मॅचची सीरिज हरली. एवढंच नाही तर इंग्लंडने आपल्या मागच्या 9 टेस्ट मॅचमध्ये 7 पराभव पत्करले आहेत. सततच्या या खराब कामगिरीनंतर हेड कोच ब्रॅन्डन मॅक्कलम आणि टीमचे क्रिकेट डायरेक्टर रॉब की यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *