Vaibhav Sooryavanshi 50 in 11 balls IND vs SL final : भारतीय क्रिकेटचा उगवता तारा आणि अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने रविवारी 21 जून 2026 इतिहास रचला आहे. श्रीलंका अ संघाविरुद्धच्या तिंरगा मालिकेच्या अंतिम सामन्यात वैभवने फक्त 11 चेंडूत अर्धशतक झळकावून लिस्ट ए (List A) क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
वैभव सूर्यवंशीचा धमाका! (Vaibhav Sooryavanshi fifty in 11 balls)
रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सलामीला आलेल्या वैभवने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला. त्याने मोहम्मद शिराजच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपल्या इराद्यांची चुणूक दाखवली. शिराजच्या दुसऱ्या षटकात तर वैभवने धुमाकूळ घालत 3 षटकार आणि 2 चौकारांसह तब्बल 26 धावा ठोकल्या. अखेर लाँग-ऑनच्या वरून पाचवा षटकार ठोकून त्याने अवघ्या 11 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
🚨 HISTORY WRITTEN BY VAIBHAV SOORYAVANSHI 🚨
– VAIBHAV HAS THE FASTEST FIFTY IN LIST A HISTORY: 11 BALLS 🤯
15 YEAR OLD KID IS UNREAL…!!!! pic.twitter.com/KrHSFKftuI
— Johns. (@CricCrazyJohns) June 21, 2026
मोडून काढला 20 वर्षे जुना जागतिक विक्रम
वैभव सूर्यवंशीने या खेळीसह श्रीलंकेच्याच कौशल्या वीराटनेचा 20 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. वीराटनेने 2005 मध्ये रागामा क्रिकेट क्लबसाठी खेळताना 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. आता 11 चेंडूंच्या नव्या विक्रमासह वैभव या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. याशिवाय, वैभवने भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानचा राष्ट्रीय विक्रमही मागे टाकला आहे. सरफराजने गेल्या हंगामात 2025/26 विजय हजारे चषकात पंजाबविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
खराब फॉर्मातून थेट विश्वविक्रमी पुनरागमन
हा ऐतिहासिक पराक्रम वैभवसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या अंतिम सामन्यापूर्वी तो खराब फॉर्मातून जात होता. चालू मालिकेत त्याच्या बॅटीतून धावा येत नव्हत्या, तसेच याच आठवड्यात मैदानावरील एका वादात त्याचे नाव आले होते. मात्र, या सर्व दबावाला झुगारून, अवघ्या 12 लिस्ट ए सामन्यांचा अनुभव असलेल्या या युवा फलंदाजाने थेट विश्वविक्रमाला गवसणी घातली. बिहारकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या वैभवच्या नावावर यापूर्वी लिस्ट ए मध्ये 190 धावांची सर्वोत्तम खेळी देखील नोंदवलेली आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला