Sanjay Dutt – Madhuri Dixit: रिलेशनशिपमध्ये असताना अचानक गायब झालेले संजय – माधुरी; पुढे जे झालं ते थक्क करणारं होतं – Marathi News | Sanjay Dutt Madhuri Dixit missed party went other place when both were in relationship during the 1990s


Sanjay Dutt – Madhuri Dixit : 90 च्या दशकातील सेलिब्रिटी आता त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी असले तरी, एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त त्यांच्या रिलेशनशिपच्या रंगायच्या… असंच काही अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत देखील झालं. माधुरी – संजय यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये सुरु असतात. पण त्यांच्याबद्दल काही किस्से समोर आल्यानंतर थक्क व्हायला होतं. दोघांच्या नात्यांबद्दल सांगायचं झालं तर, दोघे रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. सांगायचं झालं तर, एका पार्टीदरम्यान संजय आणि माधुरी गायब झाले होते आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा प्लान दोघांनी देखील खराब केलेला.

माधुरी – संजय पार्टीतून गायब झाले तेव्हा…

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत झालेल्या एका मुलाखतीत जर्नलिस्ट ज्योती वेंकटेश यांनी मोठा खुलासा केला आहे. ज्योती यांनी सांगितल्यामनुसार, संजय आणि माधुरी रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर ज्योती यांनी पार्टीचा एक किस्सा सांगितला, तेव्हा पार्टीसाठी न येता संजय आणि माधुरी दुसरीकडे कुठे गेलेले.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, ज्योती म्हणले, ‘तेव्हा इंडस्ट्री फक्त संजय आणि माधुरी यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगलेली. दोघांनी त्यांच्या नात्याची ओळख चांगले मित्र म्हणून करून दिलेली.’ शुटिंगचा किस्सा सांगत, ज्योती म्हणाले, ‘एकदा आम्ही ‘खलनायक’ सिनेमाच्या शुटिंगसाठी म्हैसूर येथे गेलेलो. तेव्हा सुभाष घाई यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. पण पार्टीमध्ये संजय देखील पोहोचला नाही आणि माधूरी देखील गायब होती…’

‘पार्टीमध्ये फक्त जॅकी श्रॉफ होते, मी आणि काही जर्नलिस्ट… माधुरी हिला गाणं गायला लावयचं.. असं जॅकी यांची प्लॅन होती… पण माधुरी पार्टीत आलीच नाही… संजय आणि माधुरी दोघे गायब होते…’, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टीसोडून संजय आणि माधुरी कुठे गेलेले… याबद्दल ज्योती यांनी मौन बाळगलं…

का झालं संजय आणि माधुरी यांचं ब्रेकअप?

संजय आणि माधुरी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. साजन, खलनायक, खतरों के खिलाड़ी, इलाका, थानेदार आणि महानता यांसारख्या सिनेमांमध्ये दोघे झळकले. तेव्हा दोघांमध्ये प्रेम बहरलं. पण असं देखील म्हटलं जातं की, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात संजय दत्तला अटक झाली, तेव्हा माधुरीने स्वतःला त्याच्यापासून दूर केलं आणि दोघांच्या नात्याचा अंत झाला. अनेक वर्षांनंतर, या दोघांनी 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलंक’ सिनेमात एकत्र काम केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *