Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 Eknath Shinde Sachin Ahir: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!


Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 Eknath Shinde Sachin Ahir: विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026) कार्यक्रम सभापती राम शिंदे यांनी काल (29 जून) सभागृहात जाहीर केला आहे. त्यानुसार, 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी अर्ज भरला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांचं धक्का बसला आहे. सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते. त्यातील सचिन अहिर होते. मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशानंतर सचिन अहिर हे पक्षप्रवेश करण्यासाठी तयार झाल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल, असा आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर तातडीने शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतल्याची माहिती आहे.  वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी त्यांनी वरळी मतदारसंघात काम केला आहे शिवाय कामगार संघटनांच्या एकजुटीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्याने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का वरळी मतदारसंघाचा विचार केला तर पाहायला मिळतोय. 

संबंधित बातमी:

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026: नीलम गोऱ्हे नव्हे, उपसभापतीसाठी शिवसेनेतून 2 जणांमध्ये चुरस; एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र?, स्मार्ट खेळीकडे सगळ्यांचं लक्ष

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *