Welcome to the jungle: अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ ची बॉक्स ऑफिसवर सिंहगर्जना, सोमवारी धुमाकूळ घातला; किती कोटी कमावले?


Welcome to the Jungle Box Office Collection Day 4: अक्षय कुमार (Akshay Kumar) अन् दमदार कलाकारांची फौज असलेला ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the Jungle) या सिनेमानं बॉकिस ऑफिसवर (Box Office Collection) दमदार ओपनिंग केली आहे.  26 जून रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. विकेंडमध्ये दमदार कलेक्शन केल्यानंतर आता हा सिनेमा विकडेजमध्येही उत्तम कामगिरी करत आहे.  सॅकनिल्कच्या ट्रेड रिपोर्ट्सनुसार,  अहमद खान दिग्दर्शित बा सिनेमा 26 जून रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता.  रविवारच्या तुलनेत सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती. दरम्यान, तरीही सोमवारी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे.    

‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमानं प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी किती कोटी कमावले? (Akshay Kumars Welcome to the Jungle Box Office Collection Day 4)

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  या सिनेमानं पहिल्या सोमवारी 8.50 कोटींचे कलेक्शन केले आहे.  रविवारच्या आकडेवारीच्या तुलनेत सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.  शुक्रवारी या सिनेमानं 15.25 कोटींचे कलेक्शन करुन ओपनिंग केली होती.  पेड  प्रीव्ह्यूमध्ये या सिनेमानं 3.75 कोटी कमावले.   तर, शनिवारी 20 कोटी आण रविवारी सर्वाधिक 24.75 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.   माहितीनुसार, भारतात या सिनेमानं आतापर्यंत   72.25 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे.  तर, 85.67 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. 

या सिनेमात बड्या कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त सुनील शेट्टी, परेश रावल, जॉनी लिवर, राजपाल यादव,  अर्शद वारस, तुषार कपूर,  श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ, उर्वशी रौतेला, कृष्णा अभिषेक यांच्यासह इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  या सिनेमातील दमदार स्टारकास्टमुळे  या कॉमेडी ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

सुरुवातीला क्रिसमस 2024 साली हा सिनेमा रिलीज करण्यात येणार होता. परंतु, शुटिंग शेड्यूल आणि व्हिएफएक्समुळे या सिनेमाची शूटिंग अर्धवट राहिली होती. या सिनेमाचे पहिले शुटिंग शेड्यूल मे 2024 साली पूर्ण झाले होते. ऑगस्ट 2024 पर्यंत या सिनेमाचे 70 टक्के काम पूर्ण झाले होते.    यानंतर UAE इंटरनॅशनल शुटिंग शेड्यूल झाले. अखेर 26 जून 2026 रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लव्ह ट्रँगल ठरला सुपरहिट! ‘कॉकटेल 2’ या सिनेमाची सोमवारीही उत्तम कामगिरी, किती कोटी कमावले?

 

महत्त्वाच्या इतर बातम्या:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *